मनसेला कल्याण डोंबिवलीमध्ये दुसरा धक्का 

कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला आज सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे थोड्या वेळेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Mandar Halbe Former MNS corporator to join BJP .jpg
Mandar Halbe Former MNS corporator to join BJP .jpg

डोबिंवली : कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला आज सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे थोड्या वेळेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दादर पक्ष कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. 

मंदार हळबे यांनी विधानसभा निवडणूक मनसेतर्फे लढवली होती. सोमवार (ता. १ फेब्रुवारी) रोजी मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज डोंबिवलीत मनसेचा दुसरा महत्त्वाचा चेहरा असलेले मंदार हळबे पक्ष सोडून जाणार आहेत. कल्याण ग्रामीणचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे या सगळ्या पक्षांतराबात राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर पोहचले आहेत.  

दरम्याण, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवार (ता. १ फेब्रुवारी) रोजी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रवेशाला महत्व दिले. कोणत्याही पदावर नसलेल्या मनसैनिकांना त्यांनी स्वतः गंडाबंधन केले. डोंबिवलीत शिवसेनेचे ताकद आहे पण तरीही तरुण रक्ताला वाव दिला जाईल, असे सांगत त्यांनी नव्याने प्रवेश करणारांनाही आश्वस्त केले. 

कल्याण- डोंबविली महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे गाजली होती. तरीही शिवसेनेने भाजपपेक्षा काही जास्त जागा जिंकून येथे सत्ता मिळवली. मनसेने येथे आठ-नऊ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व राखले होते. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील मनसेचा एकमेव आमदार याच भागातून निवडून आला होता. आमदार राजू पाटील यांनी येथे मनसेचे इंजिन रोवले. मात्र त्यांच्यात मतदारसंघातील मनसैनिकांना आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. 

मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई विरार, भिवंडी या पट्ट्यात शिवसेनेला आपला विस्तार करायचा आहे. त्यासाठीची तयारी तेथील नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यातूनच आज डोंबविलीत मनसेला धक्का देण्यात आला. कदम हे मनसेच्या स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच राज ठाकरेंसोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत असल्याने त्यांचे शिवसेनेत जाणे हे धक्कादायक मानले जात आहे. डोंबवलीतील शहराध्यक्ष, मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांचेही ठाकरे यांनी स्वागत केले.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे

1)राजेश शांताराम कदम 
मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली   शहर अध्यक्ष. माजी परिवहन सभापती

२)सागर रवींद्र जेधे 
मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष 

३)दीपक शांताराम भोसले 
डोंबिवली शहर संघटक, माजी परिवहन समिती सदस्य 

४) राहुल गणपुले 
प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष 

५) कौस्तुभ फकडे 
मनविसे डोंबिवली शहर सचिव  

६) सचिन कस्तुर
मनविसे शहर संघटक

७) स्वप्नील वाणी 
मनसे शाखा अध्यक्ष

८) निखिल साळुंखे 
मनसे उपशाखा अध्यक्ष

९) कुणाल मोर्ये 
मनविसे शाखा अध्यक्ष

१०) महेश कदम

११) राजेश मुणगेकर 
शहर संघटक

१२) प्रथमेश खरात
मनसे विभाग सचिव 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com