देवेंद्र फडणविस म्हणतात, " चष्मा न लावता वाचले तर प्रॉब्लेम होतो !'' 

मुंबईपाठोपाठ ठाण्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. येथील महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी केलेल्या सुविधांची पाहणीही फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणविस म्हणतात, " चष्मा न लावता वाचले तर प्रॉब्लेम होतो !'' 

पुणे : " चष्मा न लावता वाचले तर प्रॉब्लेम होतो ! असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. प्रारंभी काहीवेळ राज्यातील कोरोनाची कागदावरील आकडेवारी ते वाचून दाखवित होते. मात्र अचानक ते थांबले आणि खिशातील चष्मा काढला आणि डोळ्यावर लावला. 

या पत्रकार परिषदेत ठाणे, डोंबिवली, कल्याण, पुणेसह राज्यातील कोरोनाचा आढावा त्यांनी घेतला. हा आढावा घेतल्यानंतर पुढे ठाकरे सरकारचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो घेतलाच. 

राज्यातील आघाडी सरकारमध्ये कुरघाडीचे आणि अविश्वासाचे राजकारण सुरू आहे. मी अनेकवेळा स्पष्ट केले आहे, की आम्हाला हे सरकार पाडण्याची घाई नाही. आम्ही ह सरकार पाडणार नाही. तर अतंर्गतविरोधामुळे हे सरकार कोसळेल. आमच्यासाठी सरकार स्थापन करणे हा विषय महत्त्वाचा नाही तर राज्यातील बारा कोटी जनता महत्त्वाची आहे. सरकार येणे महत्त्वाचे नाही असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मुंबईपाठोपाठ ठाण्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. येथील महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी केलेल्या सुविधांची पाहणीही फडणवीस यांनी केली. रुग्णांसाठी महापालिकेने केलेल्या सोयीसुविधा सुंदर आहे आहेत. मात्र सुंदर सोयीसुविधांपेक्षा व्यवस्थाही महत्त्वाच्या आहेत याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेताना ते म्हणाले, की संकटात आम्ही सरकारवर केवळ टीका करीत नाही. तर त्यांना सहकार्यच करीत असतो. महाराष्ट्राचा टेस्टींगचा क्रमांक हा नववा लागत आहे. मात्र या टेस्ट वाढल्या पाहिजेत.महाराष्ट्रात टेस्टींगची कॅपेसिटी इतर राज्यापेक्षा अधिक आहे. सरकारने त्या दृष्टीने विचार करायला हवा. 

आघाडीच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि एकूनच कारभाराविषयी फडणवीस यांना प्रश्‍न विचारले. त्यावर ते म्हणाले, "" मुख्यमंत्री, मंत्री,अधिकारीही निर्णय घेत आहेत. कोणी कोणालाच विचार नाही. खरेतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना माहिती देऊन निर्णय होणे अपेक्षित आहे. पण, तसे होत नाही. आघाडी सरकारमध्ये गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कुरघोडीचे आणि अविश्वासाचे राजकारण दिसून येत आहे. संजय राऊत हे कपोलकपित लेख लिहित असतात असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com