पिंपळेताई, काळजी करु नका; हल्लेखोरावर कडक कारवाई करू

तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे, ताई तुम्ही काळजी करू नका.तुमच्यावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाईकेलीजाईल.
Uddhav Thackeray (10).jpg
Uddhav Thackeray (10).jpg

ठाणे :  ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या  शब्दांत करू, तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा, हल्लेखोरांवर निश्चित कडक कारवाई केली जाईल, अशा  शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांना दिलासा दिला. पिंपळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  (Chief Minister Uddhav Thackeray inquires about the health of Kalpita Pimple) 

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करतांना पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यासध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे ताई, तुम्ही काळजी करु नका, तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर कारवाई केली जाईल. तुम्ही चिंता करू नका, फक्त लवकरात लवकर बरे व्हा, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देत, तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो, तुम्ही काळजी करू नका, असे म्हणत  ठाकरे यांनी पिंपळे यांची विचारपूस केली.

ठाकरे हे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून  पिंपळे यांच्या प्रकृती बाबत माहिती घेत असतात. आज त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून  पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. 

ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर दोन दिवसापूर्वी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट तुटले. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा कल्पिता पिंपळे यांची भेट घेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई,  शिरीष सावंत व जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आदी  यावेळी उपस्थित होते. यावेळी पिंपळे यांना ठाकरे म्हणाले, ''तुम्ही काळजी घ्या, फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघून घेऊ.'' ''जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय,'' असं राज ठाकरे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com