अपप्रचार करणाऱ्या भाजपला महापौरांचा दणका : सभागृह नेतेपदावरून केली उचलबांगडी 

त्यानंतरही महापौर पाटील यांनी भाजपच्या कामिनी पाटील यांची नियुक्ती केली होती. परंतु, त्यांनी भाजपच्या निर्णयाविरोधात जाऊन हे पद स्वीकारण्यास नकार दिला.
BJP's Shyam Agarwal removed from the post of House Leader of Bhiwandi Municipal Corporation
BJP's Shyam Agarwal removed from the post of House Leader of Bhiwandi Municipal Corporation

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत मागील तीन महिन्यांमध्ये सभागृह नेतेपदी तीन नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते श्‍याम अग्रवाल यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक विकास निकम यांची नियुक्ती करून महापौर प्रतिभा पाटील यांनी भाजपला आव्हान दिले आहे. 

भाजपकडून वारंवार माझ्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याची तक्रार महापौर प्रतिभा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून केली होती. याच पत्रात अग्रवाल यांची सभागृह नेतेपदावरून गच्छंती करणार असल्याची कल्पनादेखील त्यांनी चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. 

महापालिकेच्या ऑनलाइन झालेल्या महासभेत त्यानंतरही महापौर पाटील यांनी भाजपच्या कामिनी पाटील यांची नियुक्ती केली होती. परंतु, त्यांनी भाजपच्या निर्णयाविरोधात जाऊन हे पद स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे महापौर प्रतिभा पाटील यांनी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निकम यांना संधी दिली. 

दरम्यान, महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे, असा आरोप भिवंडी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. 

भिवंडी महानगरपालिकेत अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौरपद आले आहे. त्यानंतर आता अवघे चार नगरसेवक असलेल्या रिपब्लिकन पक्षाकडे महापौरांनी सभागृह नेतेपद सोपविले आहे. त्यामुळे शहरातील प्रस्थापित भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. 

महापालिकेत भाजपच्या 20 नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेस पक्षाला शह देण्यासाठी भाजपला सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेतेपद दिले होते. 

महापौर प्रतिभा पाटील यांनी भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद प्रथम काढून घेतले. त्यानंतर सभागृह नेते पदावरही भाजपला पाणी सोडावे लागले. आता सभागृह नेतेपदी आरपीआय गटाचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला जोरदार चपराक बसली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com