मनसेचा राम कदमांना धक्का  - BJP workers join MNS in the presence of Raj Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेचा राम कदमांना धक्का 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

ठाणे आणि वसई विरार मधील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप आमदार राम कदम यांना जोरदार धक्का दिला. भाजप नेते सुनील यादव आणि  कदम यांच्या समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. मुंबईतील चांदीवली विधानसभेतील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याने राम कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
ठाणे आणि वसई विरार मधील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी पक्षप्रवेश केला. 

भाजप व शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याने महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेनेही कंबर कसली आहे. काही दिवसापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली होती. त्यानंतर मनसेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. 

हे ही वाचा...

धक्कादायक : लोणीकंदमधील भरदिवसा गोळीबारात 'गोल्डमॅन'चा खून 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सरकार घाबरलं अन् आंदी फडणवीस!

जुन्या नांदेडमधल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या युवकांनी दोन दिवसांपूर्वी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार आहे. मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे. 

दरम्याण, शहापूर तालुक्यातही ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.  त्याआधी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा रंगली होती. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख