भाजपला धक्का : प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

ठाणे जिल्ह्यात पुन्हा राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
BJP state vice-president R. C. Patil joins NCP
BJP state vice-president R. C. Patil joins NCP

भिवंडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत अखेर शनिवारी (ता. 6 मार्च) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आर. सी. पाटील यांच्या पक्षांतरामुळे भिवंडीत भाजपला खिंडार पडले आहे. पाटील हे अगोदर कॉंग्रेस पक्षात होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र अरुणकुमार पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराचे पक्षाचे अध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. 

भारतीय जनता पक्षाची राज्यातून सत्ता जाताच इतर पक्षातून आलेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दोन महिन्यांपूर्वी पक्षाला रामराम करीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते म्हणून ओळखले जाणारे आर. सी. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यात पुन्हा राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

येत्या काही दिवसांत ठाणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. असे असताना अचानकपणे पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाला नेतृत्व मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com