`कहाणीं मे ट्विस्ट? : राज ठाकरे यांचीच मनसेत येण्याची भातखळकरांना होती आॅफर!

राज्यातील वाढत्या पक्षांतराच्या मुद्यावरून राज यांनी सांगितली ती घटना
raj thackery-atul Bhatkhalkar
raj thackery-atul Bhatkhalkar

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची (BMC) भाजपने (BJP) ज्यांच्यावर सोपिवली आहे त्या आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे यांनी त्यांच्यावरच राजकीय बाॅम्ब टाकला आहे. ``ते 2009 मध्ये माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपातच राहायला सांगितले होते, असे विधान 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. (Atul Bhakhalkar wished to join MNS, Claims Raj) 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी भातखळकरांची आठवण सांगितली. '2009 च्या निवडणुकीत अतुल भातखळकर आणि भाजपाचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकिटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितले की, असे करू नका,`असे राज यांनी  या मुलाखतीत सांगितले. भाजपचे प्रवक्ते म्हणून भातखळकर हे सध्या चर्चेत असतात. राज यांनी एकदम त्यांचीच आठवण का झाली असावी, यावरही तर्क लढविला जात आहे.

भाजपच्या गोटातून या या घटनेचे दुसरे `व्हर्जन` सांगण्यात येत आहे.  2009 मध्ये अतुल भातखळकर यांना कांदिवली (पू.) येथून भाजपची उमेदवारी न मिळाल्याने राज ठाकरे यांनीच भातखळकर यांना मनसेतर्फे निवडणुक लढविण्याची ऑफर दिली होती, असे या गोटाचे म्हणणे आहे.  मात्र भातखळकर यांनी ती नाकारल्याने ठाकरे यांना त्याचा प्रचंड राग आला. त्याचे उट्टे त्यांनी आता काढले, असा या गोटाचे म्हणणे आहे. राज यांच्या बोलण्यातील विसंगतीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. भातखळकर यांच्यासह लोखंडे यांनाही आपण परत पाठवले, असे म्हणणाऱ्या राज यांनी लोखंडे यांना कुर्ला मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, असे दाखवू देण्यात येत आहे.  भाजपचे दोन नेते तिकिटासाठी माझ्याकडे आले होते, ही राज ठाकरे यांची संपूर्ण थिअरीच चुकीची आहे, हे या गोष्टीवरून सिद्ध होते, असेही यासंदर्भात सांगितले जात आहे. 

आपल्याकडे तिकिट मागण्यासाठी येणाऱ्या भाजपच्या नेत्यांची नावे आपण नितीन गडकरी यांना सांगून त्यांना परत पाठवीत होतो, असे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. मात्र ही बाब ठाकरे यांनी तसेच मनसे नेत्यांनी यापूर्वीही सांगितली होती व त्याला भाजपच्या नेतृत्वाने काडीचीही किंमत दिली नव्हती. कारण त्यानंतरही भाजपने भातखळकर यांना दोन वेळा आमदारकी दिली, महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दाखवून दिले.  

भातखळकर हे राज यांना का भेटले होते?

त्या कथित घटनेच्या पाच सहा महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने पावणेदोन लाख मते घेतल्याने भाजपचे राम नाईक पाच हजार मतांनी हरले होते. कांदिवली (पू.) मधून भाजपच्या उमेदवारीसाठी भातखळकर प्रयत्नशील होते. नाहीतरी कांदिवली विधानसभा मतदारसंघात मनसे जिंकण्याची शक्यत नव्हतीच. पण 2009 च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये म्हणून मनसेने कांदिवलीत उमेदवार उभा करू नये, अशी विनंती करण्यासाठी तेव्हा राज ठाकरे यांच्या जवळ असलेल्या एका पत्रकाराच्या मध्यस्थीने ठाकरे यांच्याकडे भातखळकर गेले होते. ठाकरे यांनी ती विनंती मान्य करून पहिल्या दोन याद्यांमध्ये कांदिवलीत आपला उमेदवार दिला नाही. मात्र नंतर भातखळकर यांनाच तिकिट न देण्याचा भाजपचा निर्णय झाला. त्यावेळी मनसेमध्ये येण्याची ऑफर ठाकरे यांनी भातखळकर यांना दिली, मात्र भातखळकर यांनी ती नाकारली. त्याचा भयंकर राग ठाकरे यांना आला, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. 2009 ची न घडलेली घटना 2021 मध्ये सांगणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, असेही भाजप नेते सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com