विरोधी पक्षनेतेपदावरून राजकारण तापले; वाद टाळण्यासाठी आयुक्तांनी दालनच केले सील 

पूर्वी विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे होते, ते महापौरांनी पुन्हा भाजपकडेच द्यावे, अशी मागणीकेली आहे.
To avoid  dispute, the commissioner of Bhiwandi Municipal Corporation sealed the hall of the Leader of Opposition
To avoid dispute, the commissioner of Bhiwandi Municipal Corporation sealed the hall of the Leader of Opposition

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण महासभेत महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसत सामील झालेले मतलुब अफजल खान उर्फ मतलूब सरदार यांची नियुक्ती केली होती. विरोधी पक्षनेतेपदी मतलुब खान यांची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नगरविकास विभागाने याची गंभीर दखल घेत मंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार खान यांच्या नियुक्तीला महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी स्थगिती दिली आहे. आयुक्त डॉ. आशिया यांच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेत्याचे दालन सीलबंद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्षनेता नसल्याने सत्ताधारी कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक खूश आहेत. 

भिवंडी महापालिकेत कॉंग्रेसचे 47 नगरसेवक असल्याने एकहाती सत्ता होती. मात्र, कॉंग्रेसमधील 18 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीस पाठिंबा दिला होता. तेव्हापासून भिवंडी शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपूर्वी कॉंग्रेसच्या त्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी कॉंग्रेसचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी हे धावपळ करीत आहेत. कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यामुळे त्याबाबतची सुनावणी सुरू झाली आहे. असे असताना कोणार्क विकास आघाडीच्या वतीने महापालिकेत भारतीय जनता पक्षाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद काढून ते कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले नगरसेवक मतलुब अफजल खान उर्फ मतलूब सरदार यांच्याकडे देण्यात आले होते. 

महापौरांनी महासभेत केलेली विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार कॉंग्रेसचे नगरसेवक दळवी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर नगरविकास मंत्र्यांच्या आदेशाने आयुक्त डॉ. आशिया यांनी खान यांच्या विरोधी पक्षनेतेपदास स्थगिती दिली. पुन्हा वाद-विवाद होऊ नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्याचे दालन महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशानुसार सीलबंद केले आहे. 

पूर्वी विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे होते, ते महापौरांनी पुन्हा भाजपकडेच द्यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक यशवंत टावरे यांनी केली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदावरून चांगलेच राजकारण तापले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com