भिवंडीत बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला; हल्लेखोरांना अवघ्या 8 तासांत अटक 

भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड चौक येथे शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) रात्री तरुणांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावर धारदार चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. भोईवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्याण कर्पे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून अवघ्या आठ तासांमध्ये म्हणजेच रविवारी (ता. 2 ऑगस्ट) पहाटे ठाणे येऊर येथून दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
Attack on police in Bhiwandi; The attackers were arrested in just 8 hours
Attack on police in Bhiwandi; The attackers were arrested in just 8 hours

भिवंडी : भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड चौक येथे शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) रात्री तरुणांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावर धारदार चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. भोईवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्याण कर्पे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून अवघ्या आठ तासांमध्ये म्हणजेच रविवारी (ता. 2 ऑगस्ट) पहाटे ठाणे येऊर येथून दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. 

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रवींद्र धनाजी भोसले (वय 20) व लखन अंकुश जाधव (वय 20, दोघेही रा. देवजी नगर, नारपोली) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. 

भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार प्रफुल्ल जाऊ दळवी (वय 52) यांना बकरी ईद सणानिमित्त भंडारी चौक येथे होमगार्ड सावंत यांच्यासोबत फिक्‍स पॉईंट ड्यूटीवर नेमले होते. शनिवारी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास किराणा दुकानाच्या बाजूला भंडारी चौक येथे दोघे जण एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस हवालदार दळवी हे सहकारी होमगार्ड सावंत यांच्यासोबत तेथे गेले.

तरुणांमध्ये चाललेले भांडण ते सोडवत होते. मारहाण करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने पोलिस हवालदार दळवी यांना जोराचा धक्का दिला. दुसऱ्याने चाकू सारख्या लोखंडी शस्त्राने त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर, डाव्या खांद्यावर तसेच डाव्या कानावर वार करून गंभीर जखमी करीत दोघेही तेथून पळून गेले. 

स्थानिक नागरिकांनी जखमी पोलिस हवलदार दळवी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बकरी ईदच्या दिवशी पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना रात्री मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना संबंधित हल्लेखोरांना अटक करण्याचे आदेश दिले. 

भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून हल्लेखोरांचा मोबाईल नंबर मिळविला. त्या मोबाईल नंबरच्या आधारे या हल्ल्यातील रवींद्र धनाजी भोसले व लखन अंकुश जाधव या दोघांचा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना येऊर ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी चौकशी केली असता हवालदार दळवी यांच्यावर लोखंडी कटरने वार करून जखमी केल्याची कबुली दोघांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोर तरुणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेश पवार तपास करीत आहेत. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com