दुखावलेल्या जितेंद्र आव्हाडांचे दुखणे फडणवीस दूर करणार का?

मुख्यमंत्र्यांनी आमदार अजय चौधरी यांना महत्व दिल्याने आव्हाड दुखावले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
After Chief Minister Uddhav Thackeray changed Decision, Jitendra Awhad met Devendra Fadnavis
After Chief Minister Uddhav Thackeray changed Decision, Jitendra Awhad met Devendra Fadnavis

मुंबई : शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्यात आलेल्या 100 सदनिकांचे ठिकाण बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कमालीचे नाराज झाले आहेत. त्या नाराजीतूनच आव्हाड यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्याच रात्री भेट घेतल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्याशी त्यांनी सुमारे अडीच तास चर्चा केल्याची माहिती आहे. (After Chief Minister Uddhav Thackeray changed Decision, Jitendra Awhad met Devendra Fadnavis)

दरम्यान, राज्याच्या राजकारणात विविध नेतेमंडळींच्या भेटीची चर्चा असताना त्या आव्हाड- फडणवीस यांच्या भेटीची भर पडली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत राहणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निर्णय बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमालीचे नाराज झाले आहेत. त्यातून त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आमदार अजय चौधरी यांना महत्व दिल्याने आव्हाड दुखावले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी तातडीने भोईवाडा परिसरातील बॉम्बे डाईंग परिसरातील जागा देण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलूनही जितेंद्र आव्हाड मात्र काहीच झाले नसल्याचे दाखवत असले तरी आपला निर्णय बदल्याच्या नाराजीमुळेच त्यांनी फडणवीसांशी सुमारे अडीच तास चर्चा केल्याची माहिती आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्यात आलेल्या सदनिकाचा निर्णय फिरवला जाणार, याची कल्पना ज्या दिवशी आव्हाड यांना मिळाली, त्याच दिवशी ते फडणवीसांना भेटले होते, असे सांगितले जाते. यासंबंधात दोन्ही नेत्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

 
टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी; म्हणून सुखकर्ता को ऑप. सोसायटीतील म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. सुमारे 300 चौरस फुट असलेले 100 फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाकडे या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

आमदार अजय चौधरी यांनी पत्रात काय म्हटले होते? 

सुखकर्ता को ऑप. या पुरभित इमारतीमध्ये ७५० मराठी कुटुंब आहेत. ही इमारत ३३ (९) अंतर्गत पुनर्विकसित करण्यात आली असल्याने या ठिकाणी प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सदनिका तयार करण्यात आलेले रहिवासी व संक्रमण शिबिरातील रहिवासी यांना कायमस्वरूपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे या इमारतीमधील ७५० कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. भोईवाडा येथील मादा गृहसंकुलामधील तयार असलेली संपूर्ण इमारत व नातेवाईकांना राहण्याकरीता देण्यात यावी. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कॅन्सरग्रस्तांमध्ये मोठया प्रमाणात होत असल्याने या सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे परिसरातील कामगार सदन, त्रिवेणी सदन, मेहता मेशन, सिंधुदुर्ग इमारत धरमशी मेशर या इमारतींमधील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com