काँग्रेस राष्ट्रवादीला घटक पक्षांच्या मदतीची आठवण राहिलेली नाही: सुशीला मोराळे

आगामी विधानपरिषदनियुक्तीवेळी तिसऱ्या आघाडीला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
sushila morale criticizes congress ncp front on power sharing issue
sushila morale criticizes congress ncp front on power sharing issue

पुणे: "काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने घटकपक्षाला सत्तेत कसलाही वाटा दिलेला नाही. त्यांना मिळालेल्या सत्तेत आमचेही योगदान होते. त्यामुळे मंत्रिमंडळात शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील आणि अबू आझमी यांना घ्यायला हवे होते," असे लोकतांत्रिक जनता दलाच्या नेत्या सुशीला मोराळे यांनी म्हटले आहे.

"भाजपला विरोध करायला आम्ही त्यांना हवे असतो पण तिसऱ्या आघाडीची ताकद वाढावी असे त्यांना वाटत नाही," अशी टीका त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केली आहे.

"आम्ही विचारधारा जपणारे पक्ष आहोत. आम्ही सत्तेसाठी काम करत नाही. आमच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला आहे. आम्ही घटक पक्षाचे नेते केवळ भाजपला विरोध म्हणून यांच्यासोबत आलो. या दोन्ही पक्षांना आमच्यामुळे मोठा फायदा झाला पण सत्तेत आल्यावर मात्र आम्ही केलेल्या मदतीची त्यांना आठवण राहिली नाही. त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले,"असे मोराळे म्हणाल्या.

"तिसऱ्या आघाडीकडे जयंत पाटील, अबु आझमी यांच्यासारखे प्रभावी नेते होते मात्र त्यांचा विचार मंत्रिमंडळ बनवताना झाला नाही. त्यांना मंत्री केले असते तर काय बिघडले असते? शिवसेनेने बच्चू कडू यांना मंत्री केले मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांचा का विचार करत नाहीत?" असा सवाल मोराळे यांनी उपस्थित केला. 

"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तिसरी आघाडी फक्त भाजपच्या विरोधात लढण्यासाठी हवी आहे. तिसरी आघाडी सक्षम व्हावी असे त्यांना वाटत नाही काय? आम्ही जर सक्षम झालो तर त्याचा फायदा पुरोगामी विचाराच्या पक्षालाच होईल,"असे मोराळे म्हणाल्या. "आगामी विधानपरिषद नियुक्तीवेळी तिसऱ्या आघाडीला दोन जागा मिळाव्यात" अशी मागणी त्यांनी केली.

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार
पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत नेतृत्वबदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे वृत्त आहे. नुकतीच पटोले यांनी केलेली दिल्लीवारी हा त्या घडामोडींचा भाग असल्याचे मानले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. अनेक नेत्यांनी पक्षांतरे करूनही काँग्रेसला नुकसान झाले नाही. 2009 च्या तुलनेत 2 जागा जास्त निवडून आल्या. निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोडी झाल्या.शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्रीपद मिळाले. ते सद्या प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्रीपद या दोन्ही जबाबदारी सांभाळत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com