दौंडवरून परत येताना डोळ्यात पाणी आले आणि गोपीनाथ मुंडेंची आठवण झाली!

माझ्या पक्षाला जेव्हा धोका दिला तेव्हा आम्ही लगेच आमच्या पक्षाच्या चिन्हावर गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली. आमचा उमेदवार निवडून आला. धोका होवूनही आम्ही आमच्या पक्षाचे अस्तित्व टिकवून दाखवले.-महादेव जानकर
rsp leader mahadev jankar recalls memories of gopinath munde
rsp leader mahadev jankar recalls memories of gopinath munde

पुणे : "ज्यावेळी भारतीय जनता पक्षाने दौंड विधानसभेच्या निवडणुकीत मला फसवले तेव्हा खूप वाईट वाटले. दौंडवरून परत येताना माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मला गोपीनाथ मुंडे यांची आठवण आली," असे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

"गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आलीच नसती" असेही ते म्हणाले.  दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करताना महादेव जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

"माझ्या पक्षाची विचारधारा वेगळी आणि भाजपची विचारधारा होती पण गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही भाजपशी युती केली. गोपीनाथ मुंडे यांनी मला बारामतीतुन लढायला सांगितले. मी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढलो. मी बारामतीत लढायला गेलो तेव्हा मला मुंडे साहेबांनी सांगितले,' टोकाची टिका करू नका.' सुप्रियाताई यांच्याविरोधात लढताना मी मुंडे साहेबांनी सांगितलेले तत्व पाळले, असे जानकर म्हणाले.

"आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाशी भाजपशी युती झाली मात्र गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर लहान पक्षांना दाबण्याचा प्रयत्न केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला दौंड आणि जिंतूर या दोन जागा दिल्या मात्र ए बी फॉर्म भाजपने स्वतःचे जोडले. हे जेव्हा मला समजले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मला मुंडे साहेबांची आठवण झाली. ते असते तर असे घडले नसते."असे जानकर म्हणाले. 

"माझ्या पक्षाला जेव्हा धोका दिला तेव्हा आम्ही लगेच आमच्या पक्षाच्या चिन्हावर गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली. आमचा उमेदवार निवडून आला. धोका होवूनही आम्ही आमच्या पक्षाचे अस्तित्व टिकवून दाखवले, असे जानकर म्हणाले.
 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव बदलणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता 'पर्यावरण व वातावरणीय बदल' विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.  विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्याअनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती मंत्री. श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी दिली.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com