मुदतवाढीने भागणार नाही, केंद्राने व्याजाचा भार सोसावा : हसन मुश्रीफ

जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. सारे व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत.
maharashtra cabinet minister hasan mushriff on central government package
maharashtra cabinet minister hasan mushriff on central government package

गडहिंग्लज (कोल्हापूर) : लॉकडाउनमध्ये केंद्र सरकारने कोट्यवधींचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ म्हणजे कर्जदारावर पुन्हा व्याजाचा भारच पडणार आहे. म्हणून केवळ मुदतवाढीने भागणार नाही. केंद्राने या व्याजाचा भार सोसावा आणि छोटे व्यापारी, हातावर पोट चालवणाऱ्यांना आर्थिक मदत करावी, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, "जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. सारे व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. गरीबांच्याकडे पैसा नसेल, तर कोरोनाशी मुकाबला करू शकत नाही. सर्वांना स्वस्त धान्याचे वाटप केले आहे. मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाला घाबरून तेथील लोक गावाकडे येत आहेत. ग्रीन झोनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जिल्ह्यात आज 427 रूग्ण आढळले आहेत. बाहेरून येणारे लोकही आपलेच आहेत, या भावनेतून दक्षता समितींनी गावागावात चांगले काम केले आहे. यामुळे कोरोनाचा सामाजिक प्रसार नियंत्रणात राहिला आहे.''

प्रांताधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, "गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यात बाहेरून 7 हजार 784 लोक आले आहेत. यातील केवळ 301 जण ग्रीन झोनमधील आहेत. एका गडहिंग्लज तालुक्‍यात 5 हजार 245 लोक आलेत. 92 टक्के लोकांचे स्वॅब घेतले होते. धोरण बदलल्याने लक्षणे असणाऱ्यांचेच स्वॅब घेतले जात आहेत. चंदगड आणि शेंद्रीतील कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्हवर उपचार व प्रथम संपर्कातील लोकांवर नियंत्रण ठेवले आहे. आज-उद्या 17 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज मिळेल. पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी दोन पथके आहेत. यामुळे एकही माणूस ट्रेसिंगविना राहत नाही. आजपासून पॉझिटिव्ह रूग्ण आढळणाऱ्यांना सीपीआरला पाठविण्यात येणार आहे.''

गटविकास अधिकारी शरद मगर यांनी क्वारंटाईन कक्षात असलेल्या हाय रिस्क लोकांची यादी तयार केली असून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. या वेळी तहसीलदार दिनेश पारगे, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, सिद्धार्थ बन्ने, किरण कदम, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, रामगोंडपाटील, महेश सलवादे, राजू पाटील, प्रशांत शिंदे, शीतल माणगावे, अमर मांगले आदी उपस्थित होते.
 
मुश्रीफ फौंडेशनचा आधार
मंत्री मुश्रीफ म्हणाले, "रेशन कार्ड नसलेले, परप्रांतीय मजूर, लॉकडाउनमुळे बंद असलेले व्यवसायिक, अतिगरीब, गरजू अशा एकूण 4200 कुटूंबांना हसन मुश्रीफ फौंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे धान्य, जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप करून आधार दिला आहे. दहा हजार नागरिकांना मास्क, 150 खासगी
डॉक्‍टरांना पीपीई किट, उपजिल्हा रूग्णालय, पोलिस ठाण्याला सॅनिटायझर, नर्स, आशा वर्कस, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक हजार फेस शिल्ड वाटप केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com