हर्षाताई म्हणतात, "सुधाकर बडगुजर हे व्यक्ती नव्हे विकासाचे मिशन.."

शिवसेनेला साजेसा स्वभाव असल्याने सध्या ते पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भविष्यात त्यांना आणखी मोठे पद मिळो आणि शहराच्या विकासाची संधी मिळेल असा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
हर्षाताई म्हणतात, "सुधाकर बडगुजर हे व्यक्ती नव्हे विकासाचे मिशन.."

नाशिक : शहराचा बहुचर्चीत आणि सबंध महाराष्ट्राच्या सर्व भौगोलीक, सांस्कृतिक घटकांचे प्रतिनिधीत्व करणारा विभाग म्हणजे सिडको, अर्थात नविन नाशिक. राजकीयदृष्ट्या तेवढाच जागरुक. या भागाचे प्रतिनिधीत्व करणारा नेता देखील तेवढ्याच क्षमतेचा, विविध घटकांवर प्रभाव असलेला, कल्पक असतो.

या सर्व निकषांत तंतोतंत बसणारे नेते म्हणजे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर. फक्त सिडकोच नव्हे तर सबंध शहरात त्यांचे चाहते तयार झाले आहेत, त्याचे कारण आहे त्यांचा दांडगा संपर्क आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची क्षमता. बडगुजर यांच्याविषयीच्या नागरिकांच्या अपेक्षा त्यामुळे वाढत आहेत.

सिडकोचा कायापालट केला
शहर आणि विशेषता सिडको परिसराच्या विकासासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यात श्री. बडगुजर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सामान्य कार्यकर्ता ते नाशिक महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता, सभागृहनेता ही त्यांची गरुडझेप सर्वांनाच चकित करणारीच आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द आणि कामाप्रती समर्पित भावना असेल तर कुणीही आपले इप्सित साध्य करून मोठे ध्येय गाठू शकतो हे बडगुजर यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळेच विधानसभेसह कोणत्याही निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याची चर्चा होते त्यावेळी सर्वप्रथम बडगुजर यांच्या नावाचा विचार होतो यात सारे काही आले!

शून्यातून शिखराकडे
बडगुजर मूळचे भोकरबादली (जळगाव) येथील. आई, वडील सामान्य शेतकरी. कष्टाने शेती करून त्यांनी मुलांना वाढविले. सुधाकर बडगुजर यांनाही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कष्टाची छोटी-मोठी कामे करावी लागली. त्यांनी इलेक्‍ट्रिकल सुपरवायझर समकक्ष डिप्लोमा मिळविल्यानंतर गावातच इलेक्‍ट्रिकल अप्लायन्सेसचे दुकान थाटले. 1991 मध्ये ते नाशिकला आले. नोकरीबरोबरच विद्युत कामांचे ते ठेके घेऊ लागले. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. सुरुवातीला सिडकोत भाड्याने घर घेऊन त्यांनी संसारही थाटला. या काळात सर्वसामान्य जनता तसेच विविध पक्षांच्या लोकांच्या संपर्कात ते आले. त्यांचा लोकसंग्रह वाढू लागला. या प्रगतीत कीाह अडथळे देखील आले. मात्र अडथळ्यांना न जुमानता, त्यावर मात करण्यासाठी त्यांनी नगरसेवक व्हायचे ठरवले.

शिवसेनेचा आश्वासक चेहरा
सिडकोतून त्यांनी निवडणूक लढवावी अशी गळ त्यांच्या मित्रांनी त्यांना घातली. त्यांच्यावर शिवसेनेचा पगडा होता. त्या पक्षाच्या संपर्कात ते होते. त्यात वावरले सुद्धा. मात्र २००७ मध्ये महापालिका निवडणूकीत भाग घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा कोणत्याच राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. ते अपक्ष लढले आणि प्रस्थापीतांना नमवून नगरसेवक झाले. अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी अशी छाप त्यांनी अल्पावधीतच पाडून मतदारांची मने जिंकली. पहिल्याच वर्षी त्यांना सिडको प्रभागाचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्याचे अक्षरशः सोने केले. 2009 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कामांचा धडाका लावला. २०१२ आणि २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत ते सपत्नीक आणि सर्वाधिक मतांनी निवडून आले. शिवसेनेत त्यांच्या कामाचे चीज झाले. गटनेता, विरोधी पक्षनेता सभागृहनेता आदी पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

विधानसभेची उमेदवारी
नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी केली. मात्र त्यांना यश आले नाही. खचून न जाता, त्यांनी जोमाने विकासकामांचा धडाका लावला. सावतानगर येथे गेली कित्येक वर्ष लोकांना कमरे एव्हढ्या खड्ड्यातून पाणी भरावे लागत असे. त्यामुळे अनेकांना आजारही झाले. लोकांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी जलकुंभ बांधण्याचा धडाका लावला. सिडकोत तीन नवीन जलकुंभ उभारले. त्यापैकी एक जलकुंभ भूमिगत आहे. आज सिडकोत मुबलक पाणीपुरवठा होत आहे. त्याचे श्रेय त्यांनाच जाते. सिडकोत विद्युत तारा उघड़या होत्या. अनेकांना त्यामुळे जीव गमवावा लगला. पतंगोत्सवाच्या काळात अनेक बालके मृत्यूमुखी पड़त. त्यांनी तात्काळ प्रभागातील शंभर टक्के विद्युत तारा भूमिगत करून घेतल्या. प्रभागात मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे. त्यांनी युवक, युवतींसाठी स्वतंत्र अभ्यासिका बांधली. सम्राट चौकातील महापालीका शाळा अद्ययावत केली. प्रभागातील सर्व रस्ते मजबूत केले. वातानुकूलित व्यायामशाळा बांधल्या. १५ ते २० वर्षापासून धूळ खात पडलेल्या क्रॉम्प्टन हॉलचे नूतनीकरण केले. 

सामान्यांचा कैवारी नेता
गोरगरीबांचे कमी खर्चात येथे विवाह, वाढदिवस, आदी समारंभ होऊ लागले. संगीत कारंजे निर्माण केले. ज्येष्ठांसाठी जॉगिंग ट्रेक उभारला. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु असल्याने कुणीही त्यापासुन वंचित राहू नये यासाठी ठीकठिकाणी वायफाय स्टेशन्स उभारण्याचा विचार आहे. पतसंस्था स्थापन करुन गरजूंना कर्ज उपलब्ध करून दिले. भविष्यात शहरात बहुराष्ट्रीय प्रकल्प आणून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. शिवसेनेला साजेसा स्वभाव असल्याने सध्या ते पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भविष्यात त्यांना आणखी मोठे पद मिळो आणि शहराच्या विकासाची संधी मिळेल असा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. या सर्व वाटचालीत त्यांच्या पत्नी, नगरसेविका हर्षाताई आणि मुलगा दिपक आणि मयुरेश यांसह कुुटंबियांचे, समर्थक व कार्यकर्त्यांचे सदैव सहकार्य मिळते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com