फडणवीसांनी राम शिंदे आणि माझा बेमालूमपणे काढा काढला; मासबेस असलेले धनगर नेते संपवले!

मराठ्यांची एक गठ्ठा मते लुंगवायचीमग धनगर मतांची गरजच काय?
ex mla anil gote criticizes devendra fadavnis on dhangar leadership issue
ex mla anil gote criticizes devendra fadavnis on dhangar leadership issue

जळगाव : धनगर आरक्षणाबद्दल केवळ फडणवीसच बोलले होते असे नाही, तर बारामती आणि सोलापूर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही बोलले होते. गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचा घोषाच होता, कि आदिवासी आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही धनगर समाजाला आरक्षण देवू, पण धनगरांना आरक्षण द्यायचे नाही, मराठयांच्या आरक्षण प्रश्‍न न्यायालयात टांगून ठेवायचा मराठ्यांना लटकवून ठेवायचे, मराठ्यांची एक गठ्ठा मते लुंगवायची मग धनगर मतांची गरजच काय? महाराष्ट्रात राम शिंदे आणि मी आम्हा दोन्ही धनगर नेत्यांचा काटा काढला. लोकाआधार असलेले धनगराबरोबर पक्षातील अन्य सर्व नेते टप्प्याटप्याने संपविले. यातूनच धनगर समाजाच्या नेतृत्वाला सुध्दा कोलवून लावायचे असे फडणवीस यांनी बेमालूमपणे रचून कारस्थान पार पाडले, असा आरोप माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे.

माजी मंत्री भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी लिहलेल्या लेखाला अनिल गोटे यांनी लेख लिहून सविस्तर उत्तर दिले आहे. या लेखात गोटे म्हणतात, महाराष्ट्रातील सर्व सरंजामदार आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील आणि सदाभाऊ खोतांच्या भारतीय जनता पक्षातच आहे.  1980 च्या नाशिक आंदोलनात सदाभाऊ खोत या नावाची व्यक्ती नव्हती, त्यामुळे त्यांना कुठल्या आंदोलनाची आणि आरोपांची आठवण झाली हे लक्षात येत नाही. त्यांच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करणे अथा इतिहासातील सत्य घटनांची जाणीव करून देणे घटनांचा साक्षीदार म्हणून आवश्‍यक व अपर्यायी आहे.
 
चाकणला शरद जोशीनी कांद्याचे आंदोलन केले, शेतकऱ्यांचा अभिनव पहिल्या आंदोलनाचे लोण वाऱ्याच्या वेगाने राज्यभरात पसरले, ज्या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्या भागापुरते कांदा आंदोलन मर्यादित होते. मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, धुळे साक्री इत्यादी कांदा उत्पादक क्षेत्रात या आंदोलनाचे पडसाद उमटले. माधवराव गोरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत येथे कांदा आंदोलन झाले. त्यावेळी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात शेतकऱ्याच्या तरूण मुलाचा मृत्यू झाला. यात मोरे यांना पोलीसांनी इतकी मारहाण केली त्यांना कानाने ऐकू येण्याचे कायमचे बंद झाले.एवढया लढाऊ शेतकरी नेते माधवराव गोरे यांना संघटनेपासून दूर का व्हावे लागले हा इतिहास फार कटू व क्‍लेशदायक आहे. कधी तरी आपण या विषयावर लेख लिहीणार आहे.
 
जोशीसमोर फडणवीसांचे काम शून्य सहकारातील वतनदारी नष्ट करण्याकरीता शरद जोशी यांनी जेवढे प्रयत्न केले, त्या तुलनेत फडणवीसांनी केलेले काम शून्य आहे. मी संघटना सोडली, संघटनेतून बाहेर पडलो याचा अर्थ शरद जोशीचे विचार सोडले असा होत नाही. शरद जोशी साखर कारखाननदारांना शेतकरी संघटनेत येवू देण्याचे टाळले, उलट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या निवडणूका लढवून कारखाने ताब्यात घ्यावे यासाठी जीवाचे रान केले. गिरणा सहकारी साखरा कारखाना शेतकरी संघटनेने ताब्यातही घेतला. नरेंद्र अहिरे यांना चेअरमन केले परंतु ते कारखाना यशस्वीरित्या चालवू शकले नाही. ही वस्तुस्थिती नाकारण्यात काही अर्थ नाही. एका साखर कारखान्याची सत्ता हाती आल्यानंतर शेतकरी संघटनेत गटातटाचे, हेव्यादाव्याचे राजकारण सुरू झाले. वसंतदादा सहकारी कारखाना कै.शांताराम आहेर संघटनेच्या नेत्यांनी ताब्यात घेतला. नंतर जे घडले ते सवश्रुत आहे. आजही सांगतो, शरद जोशी आणि शेतकरी संघटना या विषयाला सदाभाऊ खोतांना हात चालला नसता तर त्यांना उत्तर देणारे लिखाण करण्याचा खटटोप केला नसता. परंतु कुणाचाही गैरसमज अकारण होवू नये तसेच चुकिच्या गोष्टीचे समर्थन करण्याचा माझा स्वभाव नाही, शुद्र राजकीय स्वार्थासाठी तर अजिबात नाही.
 
सदाभाऊंना आरक्षण प्रश्‍नांची माहिती नाही. मराठा आणि धनगर आरक्षणाबद्दल सदाभाऊ यांनी मांडलेली मते अपिरिपक्व व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहेत. मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नाची माहिती नाही हे दुर्दैव! कॉंग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका मांडली, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा जी. आर. काढून मोकळे झाले. "धनगरांना आरक्षण मिळाले पाहिजे' अशी भूमिका गोपीनाथ मुंडे यांची होती, पंढरपूर ते बारामती पदयात्रा समारोपाच्या वेळी बारामतीला धनगर समाजाचे नेते उपाषणाला बसले होते. स्वत: देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे इत्यादी नेते त्या ठिकाणी हेलीकॅप्टरने आले होते. "भाजपची सत्ता येताच मंत्री मंडळाच्या पहिल्या बैठकित धनगर आरक्षणाचा ठराव करू 'असे आश्‍वासन देवेद्र फडणवीस यांनी दिले पण मी तुमच्यासारखे जातीय वादी बोलणार नाही, भटाने धनगराना फसविले असे जातीयवादी विचार माझ्या मनात कधीही आले नाहींत. 
फडणवीसांनी फसवणूक केली 

साक्री तालुक्‍यातील प्रकल्प का बुडाला
दूध उत्पादन, म्हशी, गायी, चिलींग प्लॅट, दुधाचे भाव त्यातील अर्थकारणात मी एवढा अभ्यासू व अनुभवी मुळीच नाही, तज्ञ तर नाहीच नाही. आमच्या भागात प्रामुख्याने साक्री तालुक्‍यातील दूध उत्पानदक शेतकऱ्यांची आपल्या अध्यक्षतेखाली दूध उत्पादक उदयोग का फसला. त्याचे दिवाळे का निघाले, आजही शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यावरील बॅंकाचे बोजे का उतरले नाहीत, आपण एका आदर्श निर्माण करण्याकरीत उभा केलेला प्रकल्प का बुडाला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com