राष्ट्रपती राजवटीची चर्चा महाविकास आघाडीकडूनच : देवेंद्र फडणवीस

युद्धात आपल्या सैन्याला वाट करून देण्यासाठी ज्या प्रकारे कव्हर फायरिंग केले जाते. त्या पद्धतीने कोरोनाला थोपविण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्याने त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे विषय ट्रोलरमार्फत पुढे आणण्यात येत आहे.
bjp leader devendra fadavnis attack on mahavikas aaghadi about spreading rumors
bjp leader devendra fadavnis attack on mahavikas aaghadi about spreading rumors

पुणे : केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करणार किंवा राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील असल्याचे वातावरण राज्य सरकारच तयार करीत आहे. कोरोनाला थोपविण्यात येत असलेले अपयश लपविण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्याठी राज्य सरकारचे हे ‘कव्हर फायरिंग’ असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राष्ट्रपती राजवटीची चर्चा महाविकास आघाडीकडूनच पसरविण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकार कोरोनाला आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याने विरोधकांबद्दल चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरवित असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘युद्धात आपल्या सैन्याला वाट करून देण्यासाठी ज्या प्रकारे कव्हर फायरिंग केले जाते. त्या पद्धतीने कोरोनाला थोपविण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्याने त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे विषय ट्रोलरमार्फत पुढे आणण्यात येत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट किंवा भाजपाचे सरकार स्थापनेचे प्रयत्न या बातम्या या पद्धतीनेच पसरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाची अभतपूर्व परिस्थिती आहे. आमची प्राथमिकता कोरोनाशी यशस्वी लढा देण्याची आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही राजकारणात आम्हाला रस नाही. मुळात राजकारण करायची ही वेळच नाही. सरकार स्थापन करण्याची तर आम्हाला अजिबात घाई नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या सरकारमध्ये समन्वय नाही. सत्तेतील घटक पक्ष कोरोनाचा मुकाबला करण्यात येत असलेले अपयश एकट्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ढकलण्याच्या प्रयत्नात आहेत. मुळात या कठीण परिस्थितीत राज्याला एका समर्थ नेतृत्वाची गरज आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्यासाठी नेतृत्वाने एका दिशेने काम करण्याची गरज असते. या सरकारमध्ये दुदुर्वेवाने तसे होताना दिसत नाही. सकाळी एक, दुपारी दुसराच निर्णय, अशी या सरकारची कार्यपद्धती आहे.कोरोनाचा सामना करताना सामान्य माणासाला अनंत अडचणींचा मुकाबला करावा लागत आहे. एम्बुलन्ससारख्या प्राथमिक सुविधादेखील मिळत नाहीत. खासगी रूग्णालयांकडून लूट सुरू आहे. या परिस्थितीत सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. मात्र, सूचना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘एक्सेस’ मिळत नाही. सरकारला मदत करण्याची आमची तयारी आहे. मात्र, कोरोनापेक्षा विरोधी पक्षच सरकारला मोठा शत्रू वाटत आहे. विरोधकांना विश्‍वासात घ्यावे, अशी आमची कायम भूमिका आहे. मात्र, या सरकारची भूमिका कायम वेगळी राहिली आहे. कोरोनाचे संकट सरकारने योग्यरित्या हाताळावे, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून सर्व प्रकारच्या सहकार्याची आमची तयारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com