राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे म्हणतात...महापालिकेने नाशिक शहर पाण्यात बुडवले - NCP Leader Ranjan Thackeray Criticized Nashik Corporation over Floods | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे म्हणतात...महापालिकेने नाशिक शहर पाण्यात बुडवले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

शहरातील पावसाळी गटारे हा भारतीय जनता पक्षावर टिका करण्यासाठी मोठा मुद्दा राजकीय पक्षांना मिळाला आहे. त्यामुळे कोणीही ही संधी सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रसेनेही शहरात पावसाने साचलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरुन भाजपवर टिका केली आहे

नाशिक : महापालिकेने शहर पावसाच्या पाण्यात बुडवले, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला आहे. सध्या विविध साथीच्या रोगांचा आणि कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा स्थितीत शहरातील स्वच्चता, नालेसफाई हा सर्वात महत्वाचा विषय आहे. मात्र महापालिकेतील प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण राहिलेले नाही. प्रशासन देखील नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांकडे दुर्लक्ष करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

शहरातील पावसाळी गटारे हा भारतीय जनता पक्षावर टिका करण्यासाठी मोठा मुद्दा राजकीय पक्षांना मिळाला आहे. त्यामुळे कोणीही ही संधी सोडण्यास तयार नाही. यासंदर्भात श्री. ठाकरे म्हणाले, ''शहरातील कॉलेज रोड, शरणपूर रोड महत्वाचा भाग व तेथील व्यापारी पेठांत पावसाने मोठी गैरसोय झाली. या भागात अक्षरशः वाहतूक बंद ठेवावी लागली होती. याचे कारण होते. पावसाळी गटारीच तुंबल्याने रस्त्यावर आलेले पाणी. महत्वाचे म्हणजे, सराफ बाजार, दहीपूल भागात पावसाचे पाणी साचून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस कोरोनामुळे या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागली होती. दुकाने सुरु करताच पावसाचे संकट आले. त्यात या व्यापाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली. पूर्वपावसाळी कामे न झाल्याने शहरात पाणी तुंबले,"

''महापालिकेतील सव्रच महत्वाची पदे भारतीय जनता पक्षाकडे असून या पक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे पूर्वपावसाळी कामे करण्यासाठी गेले काही दिवस विविध संघटना सातत्याने पाटपुरावा करीत होत्या. कोरोनाची धावपळ सुरु असल्याने त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता नागीरकांची गैरसोय झाली'' असेही ते म्हणाले. 

पावसाळ्यापूर्वची कामे झालीच नाहीत

''पावसाळ्यापूर्वी मेमध्ये पावसाळी गटारी, नालेसफाई, बंदिस्त गटारांवरील ढापे दुरुस्तीची कामे केली गेली नाहीत. नाले, बंदिस्त गटारींमध्ये पालापाचोळा, प्लॅस्टिकच्या पिशव्या व इतर टाकाऊ वस्तू असल्याने नाले व गटारे तुंबली. त्यामुळे पावसाचे पाणी साचले. ही कामे योग्य पद्धतीने न झाल्यामुळे नदीकाठच्या परिसरात तसेच सखल भागात कंबरेइतके पाणी साचल्याने घरात व इमारतीत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत,'' असा आरोप त्यांनी केला.

गटारे तातडीने साफ करा

कोरोनासह स्वाइन फ्लू, डेंगी, मलेरिया, अतिसार अशा साथीच्या आजारांचा फैलाव होऊन त्याचा ताण आरोग्यसेवेवर येऊ शकतो. त्यामुळे साथीच्या आजारांसोबत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन तातडीने गटारे साफ करण्याची मागणी करण्यात आली. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख