शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्यांचे प्रेम बेगडी : खोतकरांची दानवेंवर टीका - Shivsena Leader Arjun Khotkar Criticism on Raosaheb Danve | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्यांचे प्रेम बेगडी : खोतकरांची दानवेंवर टीका

लक्ष्मण सोळुंके
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

काल रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती.या दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला. भाजप नेत्यांना काय झालंय मला माहित नाही असं सांगत भाजप नेत्यांच्याच मतदार संघात पावसामुळे नुकसान झालं असून त्यांनी त्यांच्याच मतदार संघात दौरे तरी केले का असा प्रश्नही खोतकर यांनी उपस्थित केला

जालना : ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधी पासून जागं झालं, अशी टीका अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे.

काल रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती.या दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला. भाजप नेत्यांना काय झालंय मला माहित नाही असं सांगत भाजप नेत्यांच्याच मतदार संघात पावसामुळे नुकसान झालं असून त्यांनी त्यांच्याच मतदार संघात दौरे तरी केले का असा प्रश्नही खोतकर यांनी उपस्थित केला.

भाजपच्या लोकांना कधीपासून शेतकऱ्यांचे प्रेम आले, असे विचारून खोतकर म्हणाले, "बेगडी प्रेम दाखवून शेतकरी तुमच्याकडे वळणार नाहीत. दोन लाखांची कर्जमुक्ती दिली आहे. ठाकरेंच्या शेतकरी प्रेमाबद्दल कोणी ऐऱ्यागैऱ्याने बोलण्याची गरज नाही. ते घरात बसून नाहीत. कोरोनावर कुशलपणे मात करत आहेत. भाजपच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असे दिसते आहे. आपत्कालिन स्थितीत सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र यावे असे दिसले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही,"

मुख्यमंत्र्यांबद्दल दानवे यांनी एकेरी भाषा वापरली हे त्यांना शोभत नसल्याचंही खोतकर म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री घरात बसून काम करत नसून उद्यापासून तेही दौऱ्यावर असल्याचं खोतकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करुन पूरस्थितीची पाहणी करावी, या मागणीवर ते म्हणाले की राज्याच्या पाहणी दौऱ्यावर सर्व पालकमंत्री फिरु लागले आहेत. शरद पवार आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्रीही दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेल्या शिक्षेबदलही खोतकर यांनी भाष्य केलं. त्यांच्याबाबत विरोधक घेत असलेली भूमीका हा विरोधकांचा विषय असल्याचं त्यांनी सांगितलं. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदीरे सुरु करण्याबाबत लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना खोतकर म्हणाले, "या पत्राचा देशभरातून सर्व पत्राचा निषेध होऊ लागला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही त्याबाबत बोलल्याचे ऐकले. त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की राज्यपालांचे चुकले आहे. त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून राज्यपालांनी  त्वरीत राजीनामा दिला पाहिजे."
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख