'पहाटेच्या शपथविधी'चे संकेत पुन्हा येताहेत  - प्रकाश आंबेडकरांचा दावा - Prakash Ambedkar Comments on Aurangabad Renaming Issue | Politics Marathi News - Sarkarnama

'पहाटेच्या शपथविधी'चे संकेत पुन्हा येताहेत  - प्रकाश आंबेडकरांचा दावा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा तसा फारसा संबंध नाही हे इतिहास सांगतो. या मुद्द्यावरुन काँग्रेस व शिवसेना यांच्यात भांडणे होऊ नये, म्हणून मी हा इतिहास मांडला होता. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालावे, अशीच आमची इच्छा आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

अकोला : औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा तसा फारसा संबंध नाही हे इतिहास सांगतो. या मुद्द्यावरुन काँग्रेस व शिवसेना यांच्यात भांडणे होऊ नये, म्हणून मी हा इतिहास मांडला होता. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालावे, अशीच आमची इच्छा आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

महाविकास आघाडीतले घटक पक्ष काँग्रेस व शिवसेना यांच्यात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. याबाबत आंबेडकर यांनी आपली भूमीका मांडली. ते म्हणाले, "संभाजी महाराजांचा अंत्यविधी पुणे जिल्ह्यात करण्यात आला. त्यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. नामांतरच करायचे तर पुणे जिल्ह्याचे करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने आम्ही केली आहे. यामागे दुसरा हेतू असा होता की महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालावे. त्यांच्यात टोकाची भांडणे होऊ नयेत, म्हणून हा तोडगा होता. सेनेने हा तोडगा स्वीकारावा. प्रेस्टिज इश्यू करु नये,'' भाजप या मुद्द्यावर स्टेटमेंट वरती स्टेटमेंट करीत राहील. शिवसेनेने याबाबत आरएसएस सारखी इग्नोरन्सची भूमीका घ्यावी, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

''अशीच भांडणे चालली तर काँग्रेसला मुस्लिम व्होट बँक आहे शिवसेनेला हिंदू व्होट बँक आहे. ती सांभाळण्याच्या नादात सरकारच जाऊ नये. सकाळी चार वाजता, पाच वाजता महाराष्ट्राने एक शपथविधी पाहिलेला आहे. तसं काही होवू नये याची दक्षता घ्यावी, तसे संकेत यायला सुरुवात झाली आहे. हा शेवटी बॉल जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. त्यांना हा कॉल घ्यावा लागेल की हा प्रश्न भिजत ठेवायचा की संपवायचा आहे,''

राष्ट्रवादी काँग्रेस बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, हा एका जातीचा पक्ष आहे. त्या जातीची संख्या आहे म्हणून राज्य आहे. चालू द्या. राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात कोणत्या प्रश्नावर कुठली भूमिका घेतली आहे का हे  आधी सांगावे, असेही आंबेडकर म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख