राज्यात शिवशाही की मोगलाई? निरंजन डावखरे यांचा ट्‌विटरवरून सवाल - Nirangaj Davkhare Criticises government over ST Workers salary | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

राज्यात शिवशाही की मोगलाई? निरंजन डावखरे यांचा ट्‌विटरवरून सवाल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करत आहेत. निरंजन डावखरे त्यांचे निकटवर्ती समजले जातात. त्यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केले आहे

मुंबई  : मुंबई-ठाण्यात अडकलेल्या हजारो मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेपर्यंत पोहोचवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. मुंबई-ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. हे पाहता या राज्यात शिवशाही आहे की मोगलाई, असा प्रश्न भाजपचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना उद्देशून ट्वीटद्वारे उपस्थित केला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असताना एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी पार पाडली. एसटी कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठीही राबत आहेत; परंतु त्यांना मे महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही, डावखरे यांनी  ट्वीटद्वारे लक्षात आणून दिले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करत आहेत. निरंजन डावखरे त्यांचे निकटवर्ती समजले जातात. त्यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने ही शिवशाही की मोगलाई, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख