माजी आमदार हरिदास भदेंनी गोपीचंद पडळकरांना ठणकावले! - EX Mla Haridas Bhade Warns BJP Mls Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

माजी आमदार हरिदास भदेंनी गोपीचंद पडळकरांना ठणकावले!

मनोज भीवगडे
गुरुवार, 25 जून 2020

पडळकर हे धनगर आरक्षणावर बोलण्याचा आता नैतिक अधिकार गमावून बसले आहेत. कारण त्यांच्या पक्षाने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा शब्द दिला होता व पडळकरांनी सुद्धा माझे आई किंवा वडील जरी भाजपच्या तिकीटावर उभे राहले तर मतदान करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, नंतर तेच भाजपात गेले, अशी टिका माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे

अकोला : ''धनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून, तुम्ही भाजपच्या विरोधात गरळ ओकली. नंतर स्वार्थासाठी त्याच पक्षाशी घरोबा केला. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर तुम्हाला धनगर समजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आदरणीय शरद पवार साहेंबाची आधी माफी मागा," असा इशारा माजी आमदार हरिदास भदे यांनी दिला आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी आमदार हरिदास भदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून, अशा वरीष्ठ नेत्यावर टीका करण्याची पडळकर यांची पात्रता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्याबद्दल भाजपच्या सर्वच नेत्यांनी असहमती दाखवल्यामुळे पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुद्धा हरिदास भदे यांनी केली आहे. 

पुढे बोलताना भदे म्हणाले, "पडळकर हे धनगर आरक्षणावर बोलण्याचा आता नैतिक अधिकार गमावून बसले आहेत. कारण त्यांच्या पक्षाने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा शब्द दिला होता व पडळकरांनी सुद्धा माझे आई किंवा वडील जरी भाजपच्या तिकीटावर उभे राहले तर मतदान करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, नंतर तेच भाजपात गेले. हे सर्व धनगर समाज अजून विसरला नाही. केंद्रात व राज्यात तुमच्या भाजपची सत्ता असताना धनगरांना आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे तुम्ही धनगर आरक्षणावर बोलू नये,''

पवार यांनी बहुजन समाजाला फसविले असल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले होते. या संदर्भात पडळकरांनी मनुवादी भाजपची बहुजनांबद्दलची धेय्य धोरणे तपासावीत, असाही सल्ला भदे यांनी दिला. मतांवर डोळा ठेवून घोषणा केलेल्या एक हजार कोटीची कोणतीही आर्थिक तरतूद भाजपने जाता-जाता केली नाही किंवा रुपयाही खर्च केलेला नाही. भाजप म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे, असे सुद्धा ते म्हणाले. पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे आवाहन माजी आमदार भदे यांनी शेवटी केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख