राणेंची मुख्यमंत्र्यांवरची टीका उंदराच्या 'ढुम-ढुम-ढुमाक' गोष्टीसारखी : केसरकर - Deepak Kesarkar Attacks Narayan Rane over his remarks on Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंची मुख्यमंत्र्यांवरची टीका उंदराच्या 'ढुम-ढुम-ढुमाक' गोष्टीसारखी : केसरकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

ज्याची साधी एका कार्यालयात काम करण्याची लायकी नाही, अशांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का? असा टोला आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना लगावला आहे

सिंधुदुर्ग : नारायण राणे आणि शिवसेना वाद सुरू असतानाच त्यात आज खुद्द आमदार दीपक केसरकर यांनी उडी घेतली. राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेली टीका पहिलीच्या पुस्तकातील  उंदराच्या 'ढुम-ढुम-ढुमाक" या गोष्टीसारखी आहे. राजाने टोपी घेतली, तर राजा भिकारी आणि टोपी दिली तर राजा मला भ्याला,असे बोलण्यासारखे आहे. असा चिमटा केसरकर यांनी काढला. 

अशा प्रवृत्तीच्या विरोधात मी आजही तितक्याच तिडकीने लढा देईन,कोकणासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे, असेही केसरकर म्हणाले.  ''सिंधुदुर्गातील काही नेते जीडीपी बद्दल बोलतात.पण त्यानी जीडीपीचा फुल फाॅर्म माहिती तरी आहे का? असा टोला नारायण राणे यांना लगावला आहे. ज्याची साधी एका कार्यालयात काम करण्याची लायकी नाही, अशांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का? असा टोला नारायण राणे यांना लगावला आहे,''

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. त्यावर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली होती. आदित्य ठाकरे यांना क्लिन चिट देण्यासाठीचे दसरा मेळाव्याचे भाषण होते. देशात सर्वात जास्त ४३ हजार रूग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. मात्र त्याचा काहीही उल्लेख केला नाही. याची जबाबदारी नैतिक म्हणून मुख्यमंत्र्यांवर येतो. राज्य दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे हे कळत नाही. उद्धव ठाकरे हा माणूस मुख्यमंत्री पदासाठी अजिबात लायक नाही. पंतप्रधानांबद्दल बोलायची लायकी उद्धव ठाकरे यांची नाही,'' असे राणे म्हणाले होते. 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, असे शिवसैनिकांनाही वाटत नाही. मराठा समाजाला ठाकरे कधीच आरक्षण देऊ शकत नाही. कायदा,घटना काहीही माहीत नाही. हा बुद्धू मुख्यमंत्री आहे, असेही राणे म्हणाले होते. घरात बसून मुख्यमंत्रीपद चालवता येत नाही , महाराष्ट्राला उद्धव ठाकरे  रूपाने  पुळचट मुख्यमंत्री मिळाला आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून पिंजारात बंद होता. हा कसला वाघ , नेबळटं कुठला अशा शब्दात राणेनी मुख्यमंत्रीवर टीका केली. मी  शिवसेनेत ३९ वर्ष काम केले आहे.आतून बाहेरून मला सगळं माहिती आहे.कधी बाहेर काढू सागां हा कसला शिवसेना अध्यक्ष साधा कार्यकार्यांना भेटत नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी कधीच उद्धवला मुख्यमंत्री पद दिले नसते. अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवी शरसंधान केले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख