राणे मोठे नेते,कोणतीही मागणी करू शकतात; दादा भुसेंचा उपरोधिक टोला

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा कृषी मंत्री दादा भुसे यांनी अकोल्यात भाष्य केले
Minister Dada Bhuse Taunts at Narayan Rane
Minister Dada Bhuse Taunts at Narayan Rane

अकोला : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारे नारायण राणे हे मोठे नेते आहे. ते कोणतीही मागणी करू शकतात. प्रसंगी ते देशातही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे नेते कृषी मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी लगावला आहे. अकोल्यात खरीप हंगामाचा आढावा बैठकीनंतर कृषी मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा कृषी मंत्री दादा भुसे यांनी अकोल्यात भाष्य केले. 

मी तर लहान कार्यकर्ता असून, नारायण राणे महान नेते आहेत, अशा शब्दात भुसे यांनी राणे यांना टोला लगावला. विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या काळात भाजपला राजकरण करण्यात रस नसून, राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपची नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे भुसे म्हणाले. मात्र राणे हे भारत, अमेरीका किंवा संपूर्ण जगातच राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी करू शकतात, असाही टोला भुसे यांनी लागावला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com