केंद्र सरकार कोरोनाशी लढायचे सोडून सेलीब्रेशन करणार का? प्रविण कुंटेंचा सवाल 

लाखो मजूर अनवाणी हजारो किलोमीटर रस्त्याने पायीच निघालेआहेत. वाटेत पडत आहे, मरत आहे. देशातील 10 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला. हे सर्व फक्त केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या तुघलकी निर्णयामुळे घडले आहे, असा आरोपराष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रविण कुंटे यांनी केला आहे
NCP Spokes Person Pravin Kunte Criticize Modi Government
NCP Spokes Person Pravin Kunte Criticize Modi Government

नागपूर : नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात 'व्हर्चुअल रॅली' आणि एक हजार कॉन्फरन्स करणार असल्याची माहीती आहे. संपूर्ण देश कोरोना विषाणुसोबत जीवन-मरणाची लढाई लढत असताना भाजपला हे शोभते का, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रविण कुंटे यांनी केला आहे. 

प्रविण कुंटे पाटील म्हणाले, ''उद्या 30 मे पासून एक महिना भाजपचा हा उपक्रम सुरू राहणार आहे. या काळात भाजप खोट्या यशाचा प्रचार करणार असल्याची माहीती आहे. आज पूर्ण देश कोरोना च्या महामारीने ग्रस्त आहे. लाखो मजूर अनवाणी हजारो किलोमीटर रस्त्याने पायीच निघाला आहे. वाटेत पडत आहे, मरत आहे. देशातील 10 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला. हे सर्व फक्त केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या तुघलकी निर्णयामुळे घडले आहे. रोज 19 हजार रेल्वेगाड्या सोडण्याची भारतीय रेल्वेची क्षमता असताना कुठलीही तयारी न करता मोदी सरकारने अचानक 25 मार्चला जो निर्णय घेतला त्यामुळेच आज देशातील गरीब माणसावर ही वेळ आलेली आहे.''

''सरकारने ठरवले असते तर दोन दिवसांत लाखो मजुरांना त्यांच्या प्रदेशात घरी सुरक्षित विना मूल्य पोहोचवता आले असते व आज सुप्रीम कोर्टाला जे आदेश द्यावे लागले, त्याची वेळच आली नसती. ज्यावेळी देशात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करायची तेव्हा भाजपा 'नमस्ते ट्रम्प' आणि मध्यप्रदेशचे कमलनाथ सरकार पाडण्याचा कामात व्यस्त होते. ज्याची फार मोठी किंमत आज पूर्ण देश चुकवत आहे. भारतात आलेल्या या महामारीला नैसर्गिक आपत्ती पेक्षा भारतीय जनता पार्टीचे सरकारच जास्त दोषी आहे," असा आरोप, कुंटे यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, "आज गरीब व मध्यमवर्गीय जनतेला नगदी आर्थिक मदतीची गरज असताना भाजपाला इव्हेंट सुचते, ही अत्यन्त लाजेची गोष्ट आहे. भाजपची व्हर्चुअल रॅल्ली व एक हजार कॉन्फरसचे आयोजन देशातील गरीब माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस याचा कठोर शब्दात निषेध करत आहे.'' कोरोनाच्या कठीण प्रसंगी संवेदनहीन मानसिकतचे जे हिडीस प्रदर्शन भाजप करीत आहे, त्याला या देशातील जनता योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रविण कुंटे पाटील यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com