उमेदवारी का नाकारली हे कोरोना संपल्यानंतर समजून घेणार : विनोद तावडे

विधानपरिषद निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल असे अपेक्षित असताना भाजपने धक्कातंत्र वापरत त्यांची उमेदवारी डावलून नवीन चेहऱ्याना संधी दिली. त्यामुळे खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. खडसे यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी माजी मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मैदानात आले. त्यांची आणि खडसे यांची खडाखडी झाली.
Will Ask Party Leaders why I was denied ticket Say Vinod Tawde
Will Ask Party Leaders why I was denied ticket Say Vinod Tawde

पुणे : "मला विधानसभेची उमेदवारी का नाकारली हे मी कोरोना संपल्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून समजून घेणार आहे."असे माजी मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ते 'सरकारनामा'शी बोलत होते.

विधानपरिषद निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल असे अपेक्षित असताना भाजपने धक्कातंत्र वापरत त्यांची उमेदवारी डावलून नवीन चेहऱ्याना संधी दिली. त्यामुळे खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. खडसे यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी माजी मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मैदानात आले. त्यांची आणि खडसे यांची खडाखडी झाली.

एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी केवळ घाम गाळलेला नाही तर रक्त आटवलेलं आहे. ज्यांनी भाजप पक्ष वाढवला ते वेगळा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये कसलेही वाद नाहीत.सगळे नेते एकत्रित येऊन पक्षासाठी काम करतील "असेही तावडे म्हणाले.

याबाबत पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट वगळता काहीही प्रतिक्रिया दिली नाही. आज तावडे यांनी "भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत.सगळे नेते पुन्हा एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी काम करतील ."असे म्हणत "नाथाभाऊंनी हा पक्ष वाढवला आहे.ते वेगळा विचार करणार नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे पक्षासाठीचे योगदान मोठे आहे. त्यामुळे  पंकजा मुंडे यासुद्धा वेगळा विचार करणार नाहीत." असे तावडे म्हणाले. मला विधानसभेची उमेदवारी का नाकारली हे मी कोरोना संपल्यावर पक्षाच्या नेतृत्वाकडून समजून घेणार आहे."असे तावडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com