चंद्रकांतदादा दावा करताहेत तो 'तिसरा राजीनामा' कुणाचा! - Third Resignation from Maharashtra Ministry Soon Claims Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चंद्रकांतदादा दावा करताहेत तो 'तिसरा राजीनामा' कुणाचा!

सागर आव्हाड
मंगळवार, 6 एप्रिल 2021

राज्यात अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. आठवडाभरात ठाकरे सरकारमधील राजीनामाही येईल. राजीनाम्याची यादी तयार आहे, त्याला हळूहळू सुरुवात होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केला

पुणे : राज्यात अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) राजीनाम्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. आठवडाभरात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमधील तिसरा राजीनामाही येईल. राजीनाम्याची यादी तयार आहे, त्याला हळूहळू सुरुवात होईल, असा दावा भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केला. Third Resignation from Maharashtra Ministry Soon Claims Chandrakant Patil

भारतीय जनता पक्षाच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "एकाने चांगली कमेंट केली आहे....३६ बॉलमध्ये २ विकेट. ते  त्यांच्या कर्माने ते मरणार आहेत. तिसरा राजीनामा घेण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. १५ वर्षे एका महिलेबरोबर संबंध, घरी बोलवून मारहाण करणे, असे वेगवेगळे कारनामे आहेत. त्यामुळे एक एक गोष्ट हळूहळू बाहेर येईल,'' अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयचे (CBI) पथक मुंबईत पोहोचले आहे आणि चौकशी सुरु झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्य सरकारने (Maharashtra) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या मिनी लाॅकडाऊनबाबत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, "राज्यकर्त्यांनी कोरोनाच्या (Corona) बैठकीत वेगळे सांगितले आणि प्रत्यक्षात वेगळे नोटिफिकेशन काढले. त्यांनी फसवणूक केली आहे. मातोश्रीत बसून लॉकडाऊन लावणे सोपे आहे. आमचा लॉकडाउनला (Lock Down) विरोध नाही पण सर्वसामान्य जनतेला पॅकेज दिले पाहिजे,'' Third Resignation from Maharashtra Ministry Soon Claims Chandrakant Patil

पक्षाच्या (BJP) वर्धापनदिना निमित्त बोलताना ते म्हणाले, "संघटना वाढविणे आणि वैचारिक पातळी वाढविणे यावर आमचा भर असेल. वर्धापनदिनाच्या निमित्ताने बूथ वर कामाच्या पद्धती ठरवण्यात येणार आहेत. राज्यात सगळ्या जागा लढवून आम्हाला एक हाती सत्ता मिळवायची आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्रात एकटे लढून आम्ही सत्ता आणून दाखवू. आज मुंबईत हा वर्धापन साजरा करायचा होता. बूथ समितीच्या लोकांच्या उपस्थित चलो मुंबई म्हणून कार्यक्रम करणार होतो. पण कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात कार्यक्रम घ्यावा लागला,"
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख