`भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी पाच सेकंदात घेतला.. बिरोबामुळेच राज्यभर फिरतोय!`

पडळकर यांची सरकारनामाला खास मुलाखत...
gopichand padalkar
gopichand padalkar

पुणे : मी बिरोबाची शपथ मोडली, अशा आक्षेप माझ्यावर विरोधक घेतात. पण धनगर समाजासाठी भाजपने काम केले असल्याने समाजानेच मला भाजपमध्ये जाण्यासाठी भाग पाडले. देेवेंद्र फडणवीस यांच्याशी फक्त पाच सेकंदात झालेल्या संवादात मी भाजपमध्ये येण्याचे मान्य केले, अशी आठवण भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितली.

`सरकारनामा`ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक राजकीय घडामोडींवर मते व्यक्त केली. मी भाजपमध्ये गेलो तर मी तुमच्याकडे परत मते मागायला येणार नाही, अशी शपथ पडळकर यांनी घेतली होती. ती डावलून ते भाजपमध्ये गेले. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ``या थपथेबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूप जागरुक असल्याने ते अधुनमधुन याची ते आठवण करून देत असतात. `जे आदिवासींना ते धनगरांना` यानुसार भाजपने समाजासाठी भरपूर काम केले. त्यामुळे मला भाजपमध्ये जाण्याचा आग्रह समाजानेच धरला होता. माझी बिरोबावर आजही श्रद्धा आहे आणि त्याचा आशिर्वाद असल्याने मी आजही राज्यभर फिरतो आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणतीही अट घातली नव्हती किंवा मला आमदार करा, असेही कधी म्हणालो नव्हतो. मला आमदारकी देऊन भाजपने न दिलेला शब्द पाळला. मी भाजपमध्ये गेलो तेव्हा मला कोणतेही आश्वासन किंवा शब्द दिलेला नव्हता. प्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीस व आमची केवळ पाच सेकंदाची चर्चा झाली. त्यांची इच्छा होती मी भाजपमध्ये यावे. मी त्याला होकार दिलायाला जेव्हढाe वेळ लागला तेव्हढाच काय तो संवाद. विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात माझी अनामत जप्त झाली होती. त्यामुळे विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणीच पुढे येत नव्हती. मात्र विधान परिषदेच्या पहिल्या यादीत माझे नाव आले.

पक्षाने मला पुन्हा बारामतीतून उभे राहण्याचा आदेश दिला तर मी नक्की पाळेल. मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

ते म्हणाले, माझ्याकडे सोळा वर्षे कोणतेही पद नव्हते. सामाजाचे काम मी करीत होतो. आरक्षणासाठी राज्यभर चळवळ उभी केली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचे तर हेलिकॅाप्टर हवे. त्यामुळे हेलीकॅाप्टरने दौरा केला. त्यातून फाटकी तुटकी कार्यकर्तेही हेलिकॅाप्टरने फिरु शकतात हा संदेश आम्हाला द्यायचा होता. त्यासाठी लोकांनी आम्हाला मदत केली. समाजाच्या नवीन मुलांनी नवी साधने वापरावी असे वाटत होते. त्यामुळे तसे केले. अर्थात हे हेलिकॅाप्टर भाड्याने घेतले होते. त्यासाठी उधारी- उसनवारी करावी लागली. अजून ती फेडायची आहे.

तुमची भाषा ही आक्रमक आणि ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करणारी असते. हे चूक नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की बहुजन समाजाला समजेल, अशी भाषा वापरतो. त्यामुळे अनेकांना ती गावरान शैली वाटते. ती माझी शैली आहे. त्यामुळे यापुढेही असेच बोलत राहणार. माझी आक्रमकता अजिबात सोडणार नाही. उलट मी जे करतो, तेच माझ्या कार्यकर्त्यांनी करावे असे मला वाटते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com