सरकार मराठ्यांची थट्टा करतंय : समरजितसिंह घाटगे 

मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची माहिती टिका भाजपचे जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज केली. तर, शांत असणारा मराठा आता तीव्रतेने सरकार विरूध्द आक्रोश करेल, असा इशाराही श्री घाटगे यांनी दिला.
Government Making Mockeray of Maratha Community Say Samrjitsinh Ghadge
Government Making Mockeray of Maratha Community Say Samrjitsinh Ghadge

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची माहिती टिका भाजपचे जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज केली. तर, शांत असणारा मराठा आता तीव्रतेने सरकार विरूध्द आक्रोश करेल, असा इशाराही श्री घाटगे यांनी दिला. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यात सरकारला आपली बाजू मांडता आली नाही. सरकार मराठा समाजाती थट्टा करत आहे. न्यायालयात मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आमची तयारी आहे, हे वारंवार सांगणारे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटतच नाही. सरकार मराठा समाजाची बाजू मांडू शकत नाही याचा निषेध केला पाहिजे. शांत आणि संयमी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची भविष्यात सरकारविरूध्द आक्रोश मोर्चे सुरु होतील, असेही श्री घाटगे यांनी सांगितले. 

दरम्यान, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार देण्यास आला आहे. यापुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे. याबाबत आज महत्वाची सुनावणी होती. सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले होते. ता. ९ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारनं चार वेळा अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली.

घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांचे हे घटनापीठ आहे. ता. ४ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या अर्जासाठी खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे.खंडपीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com