उत्तम जानकर देखील लवकरच आमदार होतील 

मी भारतीय जनता पक्षात गेल्याने उत्तम जानकर नाराज झालेले नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत. माझ्यापेक्षा सिनीअर आहेत. आज नाही झाले तर उद्या ते नक्की आमदार होतील. त्यात काही शंका नाही, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar

पुणे : मी भारतीय जनता पक्षात गेल्याने उत्तम जानकर नाराज झालेले नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत. माझ्यापेक्षा सिनीअर आहेत. आज नाही झाले तर उद्या ते नक्की आमदार होतील. त्यात काही शंका नाही, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.   

आमदार पडळकर यांनी गुरवारी आज `सरकारना`ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. आपले जुने सहकारी उत्तम जानकर नाराज आहेत का? यावर ते म्हणाले, उत्तम जानकर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या पद्धतीने त्यांचे काम सुरु आहे. त्यांनी माळशिरस मतदारसंघातून निवडणूकीत उमेदवरी केली होती. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा, जिल्हा परि,द, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका लढवतात. ते नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय केलेला आहे. माझ्या पद्धतीने माझे काम सुरु आहे. आमच्या दोघांचे व्यवस्थितपणे काम सुरु आहे. जानकर यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. यासंदर्भात ते आज नाही झाले तर उद्या आमदार होती. यासंद्रर्भात ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. अनेक वर्षे त्यांनी काम केलेले आहे. माझ्या पेक्षा ते सिनीअर आहेत. मी त्यांच्या उंचीचा नाही पण आज नाही तर उद्या ते आमदार होतीलच. जो माणुस स्वप्न बघतो तो निश्चित होतोच आमदार. यासंदर्भात त्यांना मी काय टीप्स देणार, असे पडळकर म्हणाले. 

तुम्ही आमदार झाल्याने, भाजपमध्ये तुम्ही खुपच जास्त सक्रीय झाल्याने तुमचे जुने सहकारी जानकर नाराज झाल्याची चर्चा आहे. त्याचे श्री. पडळकर यांनी खंडन केले. ते म्हणाले, श्री जानकर एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते कशाला नाराज होती. ते त्यांचे काम करीतच राहतील. मी आमदार झालो मात्र समाजाच्या प्रेमापुढे आमदारकीला काही महत्व नाही. आमच्या दृष्टीने समाजाचे प्रेम व पाठींबा महत्वाचा आहे. आज मी आमदार झालो, भविष्यात महादेव जानकर देखील आमदार होती. ते भाजपमध्येही राहतील.

यावेळी पडळकर यांनी धनगर आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांची नावे घेतली. आण्णा डांगे, महादेव जानकर, खासदार विकास महात्मे यांसह काही मंडळी यासंदर्भात काम करीत आले आहेत. हे सांगतांना काही नावे राहिली. नंतर ओघानेच त्यांनी महादेव जानकर यांचाही उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले, समाजाचे अनेक नेते एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काम करीत होते. मात्र यातील कोणीही नेते शासनाच्या निर्णय प्रक्रीयेत नाही. ही आमची अडचण आहे. मात्र काल पेक्षा आजची स्थिती चांगली आहे. समाजातील युवक शिक्षीत होत आहेत. माहिती घेत आहेत. अभ्यास करतात. त्यांना या विषयावर चांगली जाण आल्याने आम्ही समाधानी आहोत. राज्यात धनगड समाज अस्तित्वात नाही हे कागदावर आम्ही सिद्ध केले आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com