एक राजा बिनडोक : प्रकाश आंबेडकर यांची टीका - Prakash Ambedkar Criticism regarding Maratha Reservation | Politics Marathi News - Sarkarnama

एक राजा बिनडोक : प्रकाश आंबेडकर यांची टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या, अशी मागणी करणारे पत्र सुरेश पाटील यांनी मला पाठविले आहे. महाराष्ट्राचे सामंजस्य बिघडू नये, यासाठी आम्ही बंदला पाठिंबा देत आहोत. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे

पुणे : आमचे आरक्षण रद्द झाले तर सर्वांचे आरक्षण रद्द होईल, असे म्हणणारा एक राजा वेडा आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यावर टीका केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमीका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, त्यामुळे येत्या १० आॅक्टोबरला पुकारलेल्या बंदला पाठिंबा असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले. 

मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या, अशी मागणी करणारे पत्र सुरेश पाटील यांनी मला पाठविले आहे. महाराष्ट्राचे सामंजस्य बिघडू नये, यासाठी आम्ही बंदला पाठिंबा देत आहोत. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे आरक्षण रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. अशी मागणी करणारा राजा बिनडोक आहे. त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? याचे मला आश्चर्य वाटते. अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली. 

राज्य सरकारने एमपीएससी परिक्षा घेण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यामुळे या परिक्षा रद्द न करता त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. कोरोनानंतरच्या काळात राज्य सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. बरेचसे व्यवहार पूर्ववत होत आहेत. त्यामुळे मंदीरे तर दोन महिन्यांपूर्वीच उघडायला हवी होती, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख