भाजपला परिस्थितीचे भान नाही : राजू शेट्टींची टिका

गेल्या वर्षी महापूर आला तेव्हा भाजपचे मंत्री किती बेजबाबदारपणे वागत होते तरी आम्ही त्यांच्यावर टिका केली नाही.राजकारण करत बसलो नाही.तर लोकांना मदत करत राहिलो. आम्ही टिका करावी असेच भाजपचे नेते वागत होते. मात्र, आम्ही त्यांच्यावर टीका केली नाही, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केले
Raju Shetty Criticizes BJP Over agitations
Raju Shetty Criticizes BJP Over agitations

पुणे : ''वेळ कोणती आहे आणि आपण काय करतोय याच भान भाजपला नाही. त्यामुळे ते आंदोलन करण्याची भाषा करत आहेत. विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नाही एवढच मला म्हणायचं आहे." असे माजी खासदार राजू शेट्टी 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.

भाजपने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे पत्र कार्यकर्त्यांना पाठवले आहे. यावर राजू शेट्टी यांनी टिका केली आहे. याबाबत शेट्टी म्हणाले,"मी आजवर अनेक वर्षे विरोधी पक्षात काम केले आहे. पण संकटाच्या काळात मात्र त्या त्या सरकारशी संवाद ठेवला. एकमेकांच्या हातात हात घालून संकटावर मात केली.जेव्हा आघाडीचे सरकार सत्तेत होते तेव्हा सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. तेव्हा आम्ही राजकारण करत बसलो नाही. तर सरकारला साथ देण्याची भूमिका पार पाडली,'' 

'तेव्हा' आम्ही त्यांच्यावर टिका केली नाही

"गेल्या वर्षी महापूर आला तेव्हा भाजपचे मंत्री किती बेजबाबदारपणे वागत होते तरी आम्ही त्यांच्यावर टिका केली नाही.राजकारण करत बसलो नाही.तर लोकांना मदत करत राहिलो. आम्ही टिका करावी असेच भाजपचे नेते वागत होते. मात्र, आम्ही त्यांच्यावर टीका केली नाही किंवा आंदोलन केले नाही. ती वेळ राजकारण करण्याची नव्हती तर लोकांना मदत करण्याची होती " असे शेट्टी म्हणाले.

आज कोरोनाच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असताना भाजपवाले स्टंट करत आहेत. आंदोलन करण्याची भाषा करत आहेत.अस करण्याची आजची वेळ आहे का?, असा सवाल शेट्टी यांनी विचारला. आपल्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे आणि हे कसे वागत आहेत. एवढा बेजबाबदारपणा बरा नाही." असे शेट्टी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com