पडळकरांच्या विधानाचा विषय आता संपला : चंद्रकांत पाटील - Gopichand Padalkar Chapter is Closed Claims Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकरांच्या विधानाचा विषय आता संपला : चंद्रकांत पाटील

संपत मोरे
सोमवार, 29 जून 2020

गोपींचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली. पडळकर यांनीही भावनेच्या भरात बोललो असे सांगितले. त्यामुळे आता हा विषय संपला आहे, असे चंद्रकांत पाटील येथे म्हणाले

पुणे-"गोपीचंद पडळकर भावनेच्या भरात बोलले आहेत. हे त्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे आता हा विषय संपला आहे." असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. गोपींचंद पडळकर यांनी भावनेच्या भरात बोललोय असे देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ सांगितले आहे. त्यामुळे हा विषय आता संपला आहे.तो वाढवण्याची गरज नाही" असे पाटील म्हणाले.

''गोपींचंद पडळकर यांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत,'' असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली आहे, असे सांगून पाटील म्हणाले, "गोपींचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली. पडळकर यांनीही भावनेच्या भरात बोललो असे सांगितले. त्यामुळे आता हा विषय संपला आहे.तो वाढवू नये."

गिरीश महाजन यांनी पहिल्यांदा तुम्हाला 'चंपा' म्हणायला सुरुवात केली असे अनिल गोटे यांनी म्हटले आहे, असे विचारता पाटील म्हणाले, "पहिल्यांदा कोण म्हणाले हे शोधावं लागेल. पण माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला जातो. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली आहे." हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानावर पाटील म्हणाले,"आम्ही त्यांच्या धमक्यांना भीत नाही.आम्ही त्यांना गंभीरपणे घेत नाही."
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख