माझ्यानंतर बारा वर्षांनी खडसेंवरही 'तीच' वेळ आली : प्रकाश शेंडगे - Ex MLA Prakash Shendge Comments on Ekanath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्यानंतर बारा वर्षांनी खडसेंवरही 'तीच' वेळ आली : प्रकाश शेंडगे

सागर आव्हाड
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बारा वर्षी पूर्वी ही वेळ माझ्या वर आली होती तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, की आज मी जात्यात आहे पुढची मूठ जात्यात तुमची असेल  आणि ती वेळ आता खडसे यांच्यावरही आल्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे येथे म्हणाले

पुणे : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बारा वर्षी पूर्वी ही वेळ माझ्या वर आली होती तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, की आज मी जात्यात आहे पुढची मूठ जात्यात तुमची असेल  आणि ती वेळ आता खडसे यांच्यावरही आल्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे येथे म्हणाले.

अनेक बहुजन नेत्यांवर भाजपने अन्याय केला असल्याचा आरोपही शेंडगे यांनी केला. ते म्हणाले, "भाजप वाढवण्यासाठी तळागाळात आम्ही काम केले, तेव्हा भाजपने माझे तिकीट कापले होते. तीच वेळ एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने आणली.  त्यांचेही तिकीट भाजपने कापले.'' असा अन्याय होणार असेल तर बहुजन नेते भाजप सोडतील, असेही शेंडगे म्हणाले.

मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती, म्हणून मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. आता एकनाथ खडसेंवरही भाजपने तीच वेळ आणली, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केले. मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते. एकनाथ खडसेसुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला; तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मी मागणी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला. तसेच माझं तिकीट कापण्यात आलं,'' असे शेंडगे म्हणाले. 

संबंधित लेख