रामदास आठवलेंनी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला! - Congress should Withdraw Government Support Suggests Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

रामदास आठवलेंनी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला!

संपत मोरे
रविवार, 14 जून 2020

गेल्या दोन   दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मंत्रीमहोदयांनी सरकारमध्ये आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे म्हटले होते.काँग्रेसच्या मंत्र्यांची एक बैठकही याबाबत झाली होती. काँग्रेसच्या नाराजीच्या बातम्या आल्यावर उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती. त्याबाबत रामदास आठवले यांनी पाठिंबा काढण्याचा सल्ला काँग्रेसला दिला आहे

पुणे : "महाराष्ट्रात तिघाडी सरकार मध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची  नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे.काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा." असा सल्ला समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. दोन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातील मंत्री नाराज असल्याचा बातम्या येत होत्या. त्यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले यांनी ट्विट करून याबाबत आपला सल्ला काँग्रेसला दिला आहे. गेल्या दोन   दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मंत्रीमहोदयांनी सरकारमध्ये आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे म्हटले होते.काँग्रेसच्या मंत्र्यांची एक बैठकही याबाबत झाली होती. काँग्रेसच्या नाराजीच्या बातम्या आल्यावर उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती. अजूनही काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचे समजते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.

बाळासाहेब थोरातांंनी काँग्रेस नाराज असल्याचे केले होते मान्य

महाआघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षात मतभेद असल्याचे अखेरीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अधिकृतरित्या मान्य केले होते. तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असे या मतभेदांचे वर्णन केले होते. कोकण दौऱ्याच्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली होती. महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या बातम्या अधुनमधुन येत असल्याने याबाबत रोज घटक पक्षांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. 

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. बाळासाहेब थोरात यांनी याधीही भावना व्यक्त केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.

मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर काँग्रेसचे नेते खार खाऊन आहेत. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यास विरोध होत आहे. तसेच इतर निर्णयांतही काँग्रेसला महत्त्व दिले नसल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आक्रमक झाले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलून पक्षाच्या भावना पोहोचविणार असल्याचे अधिकृतरित्या सांगितले आहे. त्यात आता रामदास आछवले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख