छगन भुजबळ म्हणतात...शरद पवारांनी अनेकांना गारद गेले! - Chagan Bhujbal Reacts on Sanjay Raut Tweet about Sharad Pawar Interview | Politics Marathi News - Sarkarnama

छगन भुजबळ म्हणतात...शरद पवारांनी अनेकांना गारद गेले!

सागर आव्हाड
गुरुवार, 9 जुलै 2020

संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीची उत्सुकता महाराष्ट्रासह संबंध देशाला आहे. मला ही आहे.नक्की काय काय सांगितले आहे. हे पाहायचं आहे.बाकी शब्दांचा खेळ चालत राहतो, आणि तसे ही शरद पवारांनी अनेकांना गारद केलेलच आहे त्यामुळे ते शब्द अतिशय समर्पक आहे असं वाटते, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली

पुणे : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीची उत्सुकता महाराष्ट्रासह संबंध देशाला आहे. मला ही आहे.नक्की काय काय सांगितले आहे. हे पाहायचं आहे.बाकी शब्दांचा खेळ चालत राहतो, आणि तसे ही शरद पवारांनी अनेकांना गारद केलेलच आहे त्यामुळे ते शब्द अतिशय समर्पक आहे असं वाटते, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली.

एक शरद, सगळे गारद असे सांगत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा प्रोमो आपल्या ट्वीटरवरुन प्रसिद्ध केला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया  दिली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. मालेगावबाबत बोलताना ते म्हणाले,''मालेगाव मध्ये आकडेवारी लपवली जात नाही. एकेकाळी मालेगाव मध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडत होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आकडेवारी लपवण्याचा प्रश्न येतच नाही. आकडेवारी लपवली जात आहे या देवेंद्र फडणवीसांच्या आरोपात तथ्य नाही.''

मुंबईत सारथी संबंधातील बैठकीत गोंधळ झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ''सारथी बैठकीत आज मुबंईत काय गोधळ झाला याबद्दल माहिती नाही.पण मराठा आरक्षण टिकल पाहिजे, मिळालं पाहिजे,'' जेव्हा एखादा मंत्री काम करत असतो तेव्हा तो सगळ्यासाठी काम करत असतो. तो काही उणेदुणे करणार नाही. आता मंत्र्यांचे कुठे चुकते ते तुम्ही सांगितले पाहिजे. आपण जे करतो, त्यातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले. 

Edited By : Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख