शेतकऱ्यांना  तीन लाखांपर्यंत  शून्य टक्क्याने कर्जपुरवठा

शेतक-यांना यंदाच्या हंगामापासून तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शुण्य टक्के व्याज असेल. त्यासाठी त्यांनीनियमित कर्जफेड करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली कर्जफेड वेळेत करण्यास सुरवात करावी.
Dada Bhuse
Dada Bhuse

मालेगाव :शेतक-यांना यंदाच्या हंगामापासून तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शुण्य टक्के व्याज असेल. त्यासाठी त्यांन ीनियमित कर्जफेड करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली कर्जफेड वेळेत करण्यास सुरवात करावी, असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ते म्हणाले, व्याजाच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी व शेतकरी थकबाकीदार होऊ नये, यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या व ते वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०२१ च्या खरीप हंगामापासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून तसेच राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण व खासगी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या कर्जावर वार्षिक तीन टक्के व तीन लाखांपर्यंतच्या पीककर्जावर वार्षिक एक टक्के दराने व्याज सवलत योजना सुरू आहे. शेती व्यवसायावर येणाऱ्या विविध नैसर्गिक संकटांमुळे अनेकदा पीककर्जावरील व्याज भरणे शेतकऱ्यांना अडचणीचे होते. व्याजाच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, यासाठी श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडे, तसेच मंत्रिमंडळ बैठकीत श्री. भुसे यांनी तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करावा, अशी विनंती केली होती. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. खरीप हंगाम २०२१ पासून तीन लाखांपर्यंतच्या पीककर्ज घेणाऱ्या व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचे जाहीर केले. पीककर्जावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांतर्फे शासनामार्फत चुकती करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निर्णयाबद्दल श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.  
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com