नाशिकला कोरोना विरोधात "टेस्ट; ट्रॅक; ट्रीट अँड व्हॅक्सिनेट" 

“टेस्ट; ट्रॅक; ट्रीट अँड व्हॅक्सिनेट" ही कोरोना व्यवस्थापनाची प्रमुख चार अंगे आहेत. यावरच आधारित कोरोना नियंत्रणाची पुढील दिशा निश्चित केली आहे. त्यानुसार कामकाज प्रभावीरीत्या केल्यास तातडीने संसर्गावर नियंत्रण येऊ शकते, असे निर्देश आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : “टेस्ट; ट्रॅक; ट्रीट अँड व्हॅक्सिनेट" ही कोरोना व्यवस्थापनाची प्रमुख चार अंगे आहेत. यावरच आधारित कोरोना नियंत्रणाची पुढील दिशा निश्चित केली आहे. त्यानुसार कामकाज प्रभावीरीत्या केल्यास तातडीने संसर्गावर नियंत्रण येऊ शकते, असे निर्देश आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील तालुकास्तरावरील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना नियंत्रणाबाबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी  श्री. मांढरे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अत्यंत योग्य नियोजन करून कार्यवाही करणे आवश्यक झालेले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत उपाययोजना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कराव्यात. त्याचा तालुकानिहाय आढावा चालू आठवड्यापासून प्रत्यक्ष घेण्यात येईल, तसेच या उपाययोजनांचे पालन न झाल्यास संबंधित व्यक्ती कायद्यातील तरतुदीनुसार गंभीर शास्तीस पात्र ठरेल याची जाणीव प्रत्येकास करून द्यावी.

ते म्हणाले, त्यात प्रामुख्याने कंटेनमेंट झोन मधील प्रभावी व्यवस्थापन हा संसर्ग रोखण्याचा सर्वात महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे व त्याला प्रतिसाद न मिळाल्यास राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.  राज्य शासनाने नुकतीच जारी केलेली अधिसूचना तसेच जिल्ह्याने यापूर्वी जारी केलेले आदेश याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर करावी.  

कोव्हीड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) येथे मृत्यू होणार नाही याबाबत ‘सीसीसी’ मधील रुग्णाची नियमित तपासणी होत असल्याची खात्री करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. एखाद्या रुग्णाची स्थिती खालावल्यास त्याला वेळीच ‘डीसीएचसी’मध्ये/ ‘डीसीएच’ मध्ये स्थलांतरीत करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी रूग्ण हताळणीचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. त्यामध्ये शिफ्टनिहाय कर्मचाऱ्यांची नावे, ॲम्ब्युलन्स क्रमांक, वाहनचालकाचे नाव, ‘सीसीसी’ ते ‘डीसीएचसी’ किंवा ‘डीसीएच’ असा प्रवासाचा मार्ग इत्यादी बाबींचा समावेश असावा. 

माहितीचे व्यवस्थापन सुनियोजित करून तालुक्यातील कोरोना संबंधित सर्व आकडेवारी संकलित होऊन ती प्राधिकाऱ्यांना योग्य वेळीच सादर केली जाते, याबाबत खात्री करणे. काम करण्याइतकेच त्या कामाची पोर्टल वर योग्य प्रकारे नोंद होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, हे ध्यानात घ्यावे, अशा सूचना श्री मांढरे यांनी दिल्या. 
 ...


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com