राज्यात रेमडेसिव्हिरचा मुबलक साठा कमी दरात उपलब्‍ध

गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ऑक्सिजन उत्‍पादनात या वर्षी वाढ झाली आहे. रुग्‍णसंख्या वाढीची गती वाढत असल्‍याने ऐंशी टक्‍के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी राखीव ठेवण्याबाबत सुचविले असल्‍याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली.
Abhimanue Kale
Abhimanue Kale

नाशिक : गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ऑक्सिजन उत्‍पादनात या वर्षी वाढ झाली आहे. रुग्‍णसंख्या वाढीची गती वाढत असल्‍याने ऐंशी टक्‍के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी राखीव ठेवण्याबाबत सुचविले असल्‍याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली.

ते म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव उच्चांकावर पोचलेला असताना सुमारे दहा टक्‍के रुग्‍णांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासत होती. काही दिवसांपासून राज्‍यात कोरोनाच्‍या फैलावाची गती वाढलेली असली तरी ऑक्सिजनची आवश्‍यकता असलेल्‍या रुग्‍णांचे प्रमाण कमी आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्‍या श्री. काळे यांनी कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍यस्‍तरावरील उपाययोजनांची माहिती दिली. नाशिक विभागाच्‍या सहआयुक्‍त माधुरी पवार व अन्‍य अधिकारी या वेळी उपस्‍थित होते. रेमडेसिव्हिर इन्‍जेक्‍शनचा मुबलक साठा असून, विक्रेत्‍यांच्‍या नफ्यासंदर्भात व्यवस्थितरीत्या आखणी केल्‍यामुळे कमी दरात इंजेक्‍शन उपलब्‍ध होऊ लागले असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. या वेळी श्री. काळे म्‍हणाले, की गेल्‍ यावर्षीच्‍या अनुभवामुळे यंदा नियोजन आखणे सोपे झाले आहे. शासकीय रुग्‍णालयांच्‍या आवारात ऑक्सिजन साठवणुकीसाठी टाक्‍या बसविण्यात आल्‍याने सुविधा झालेली आहे. अखंडित ऑक्सिजन पुरवठा ठेवण्यासंदर्भात विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ऐंशी टक्‍के ऑक्सिजन पुरवठा करण्याचा अभिप्राय विभागाच्‍या सचिवांना दिला आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज वीस टक्‍के ऑक्सि‍जनवर भागेल, असा दावाही त्‍यांनी केला.

तीन कंपन्‍यांच्‍या माध्यमातून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्‍ध होत आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार इंजेक्‍शनचा साठा उपलब्‍ध असून, नियमितपणे साडेतीन हजार इंजेक्‍शनची उपलब्‍धता होत असल्‍याने तुटवडा भासणार नाही. राज्‍यातही सर्वत्र उपलब्‍धतेची अडचण नसेल, असेही त्‍यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील विविध शहरांची स्थिती संवेदनशील बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रीय झाले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विविध उपाय केले असुन सातत्याने प्रशासकीय स्तरावर त्याचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे श्री. काळे यांनी काल नाशिक शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यासंदर्भात त्यांनी केवळ प्रशासकीय अहवाल व अधिका-यांच्या माहितीवर विसंबून न राहता विविध विभाग व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांशी देखील चर्चा केली. त्यामुळे नाशिक हे राज्यातील कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील नसले तरी त्यावर बारीक नजर आहे, ही वस्तुस्थिती आहे.
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com