आधी अवजड होते; आता सूक्ष्म उद्योग झाले! - Previous it was heavy now it is micro, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आधी अवजड होते; आता सूक्ष्म उद्योग झाले!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाला. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा समावेष झाला, ही आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आधी महाराष्ट्राला अवजड उद्योग खाते होते. त्याचे आता सुक्ष्म उद्योग झाले, अशी मिश्कील टिप्पणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

नाशिक : केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाला. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा समावेष झाला, ही आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आधी महाराष्ट्राला अवजड उद्योग खाते होते. त्याचे आता सुक्ष्म उद्योग झाले, अशी मिश्कील टिप्पणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आज झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. सध्या धरणांतील साठा पुरेसा आहे. मात्र ३१ ऑगष्ट पर्यंतचे नियोजन करण्यासंदर्भात काय करता येईल, याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जलसंपदा खात्याने सांगीतले तर पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागेल. शेवटी ती जबाबदारी पाटबंधारे विभागालाच घ्यावी लागेल. याबाबत पुढील बैठकीत निर्णय होईल.

विधानसभा असभापती काँग्रेसचाच
विधानसभेच्या सभापती निवडीबाबत काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी हा विषय लवकर संपवावा या दृष्टीने निर्वाणीचा इशारा दिला आहे. याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, नितीन राऊत यांनी जी मागणी केली ती आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे. विधानसभा सभापतीपद काँग्रेसलाच मिळणार आहे. फक्त मधल्या काळात कोव्हिडमुळे कामकाजावर परिणाम झाल्याने ती प्रक्रीया लांबली. कोव्हिडमूळे काही काळ ते थांबवलं होतं. 

राणेंचे अभिनंदन केले
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रातून नारायण राणे यांचा समावेष झाला. ही चांगली बाब आहे. यासंदर्भात मी श्री. राणे यांना मी फोनवरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फक्त पूर्वी राज्याला अवजड उद्योग खाते मिळत असे. ते आता सुक्ष्म उद्योग झाले आहे. नाशिकच्या भारती पवार राज्यमंत्री झाल्या आहेत. त्या माझ्या मतदारसंघाशी संबंधीत आहेत. त्याचाही आनंद आहे. मंत्रीमंडळ विस्तारावरून मुंडे भगीनी  नाराज असल्याबाबत मला माहिती नाही. यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीसांच्या मतापुढे जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं आहे की, यासंदर्भात उगीचच बदनामी करू नका. त्यामुळे मी काही बोलणार नाही.  

`ईडी`ची कारवाई सुडाने
केंद्र सरकार सध्या राजकीय नेत्यांना धाकात ठेऊ इच्छिते. त्यासाठी विविध प्रकारे ते प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यामुळे त्यांच्यावर `ईडी`ची कारवाई होते आहे काय? यावर ते म्हणाले, खडसे यांच्यावरील कारवाई निश्चितच राजकीय आकसापोटी आहे. इतर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात यावे किंवा भाजपातून बाहेर जाऊ नये यासाठी ही कारवाई होते आहे. 

लसीकरणाबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले लसीकरणाविषयी महाराष्ट्रात अतिशय जोमात काम सुरु आहे. स्फुटणीक ही रशीयन लस देखील काही दिवसात दाखल होईल. सध्या राज्यात आम्ही रोज एक लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो. मात्र पुरेशा प्रामणात लस साठा उपलब्ध नाही. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. मुंबईत देखील संख्या कमी झाली आहे. शंभर टक्के संख्या संपली अस आम्ही म्हणत नाही. मात्र राज्यातील कोरोना स्थिती संदर्भात पंतप्रधान वेगळे का बोलले हे मला माहिती नाही. 

ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार कोरोना विषयक उपाययोजनांबाबत तज्ञांशी चर्चा करीत आहे. पंतप्रधानांनी लस आणल्यास सगळ्यांनाच मदत होईल. राजकीय पक्षांनी आंदोलन केले नाही तर वेळ निघून जाईल म्हणून आंदोलन करावं लागतंय. मात्र लोकांना प्रश्न लक्षात येईल एवढंच आंदोलन करावं. 
....
हेही वाचा...

नाशिकच्या तिघा महिलांनी सांभाळले राज्य, देशाचे आरोग्य!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख