अजित पवारांच्या वाढदिवशी जांभळाचे झाड का लावले?

या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तेथे पुन्हा जांभळाचे झाड लावले.
Narhari Zirwal
Narhari Zirwal

नाशिक : प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात  वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होत आहे. हे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती विधानसभेचे उपसभापती नरहली झिरवाळ यांनी सांगितले. 

ते म्हणाले, घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रोवली होती. त्यांच्यासह तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे यांच्याकडे जिल्ह्याचे नेते, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, तत्कालीन  आमदार उत्तमबाबा भालेराव, दिलीप बनकर यांसह मी देखील मी केला. सातत्याने पाठपुरावा केल्याने काम बंद पडल्यावर ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ व मी सातत्याने पाठपुरावा केला होता.

ते पुढे म्हणाले, मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात येऊन ते पाणी गोदावरी खोऱ्यात येऊ लागल्याने या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्याचा आनंद वाटतो. स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणे, अजूनही वाया जाणारे पाणी अडविणे, सदर प्रकल्पस्थळी पर्यटन विकास औषधी वनस्पती लागवड व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. मात्र या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मी तेथे पुन्हा जांभळाचे झाड लावले. त्याने या परिसरात पुन्हा औषधी झाडे लावत वनराई फुलवण्याचा मनोदय आहे.

या प्रकल्पातील शिल्लक जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करुन येथे वनराई उभी करुन पर्यटन विकास करण्याचा प्रयत्न आहे. अनेक वर्षे काम रखडलेल्या मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे  या बोगद्यातून पाणी पश्चिमेकडून पूर्वेला वळले आहे. ते पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले. नुकतेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मांजरपाडा प्रकल्पला भेट दिली. यावेळी युवकांनी आमदार झिरवाळ यांच्याकडून सर्व प्रकल्पाची माहिती घेतली. 

श्री. झिरवाळ यांनी विविध साईटवर अजूनही पाणी अडवून ते पूर्वेला वळवणे शक्य आहे का यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शासनाने मंजूर असलेल्या पाच वळण योजना रद्द केल्या. शासन याबाबत अनास्था दाखवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रकल्पातील शिल्लक जमीन देवसाने ग्रामपंचायती कडे वर्ग करण्याची मागणीही आत्यांनी केली. 

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी यांचेसह बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ योगेश गोसावी, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, निलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, अमोल गणोरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ अनिल सातपुते, डॉ,विजय गटकळ आदीसह त्यांनी नुकताच या भागातीलशेतकर-यांच्या भेटी घेतल्या.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com