Keda Aher, BJP
Keda Aher, BJP

मी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही !

मी सर्वाधीक तीन वर्षे कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मी काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही. आज ना उद्या मी अध्यक्षपदावरुन पायउतार झालोच असतो. मात्र बॅंक सक्षम झाली पाहिजे.

नाशिक : मी सर्वाधीक तीन वर्षे कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मी काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही. आज ना उद्या मी अध्यक्षपदावरुन पायउतार झालोच असतो. मात्र बॅंक सक्षम झाली पाहिजे. त्यासाठीच मी काम केले आहे, असे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितले.

नाबार्डने जिल्हा बॅंकेचेसंचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त केला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर येत्या एक दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बॅंकेचे अध्यक्ष श्री. आहेर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ही कारवाई व्यक्तीशः माझ्यावर नव्हे तर संचालक मंडळावर होईल, ती बॅंकेवर होईल. व्यक्तीशः माझ्याविरोधात काहीही नाही. हे प्रकरण देखील मी अध्यक्ष होण्याच्या आधीचे आहे. त्यात कलम 110 अन्वये कारवाई झालेली आहे. मी काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही. आज ना उद्या मला पायउतार व्हावेच लागले असते. 

ते म्हणाले, गेले तीन वर्षे काम करताना अनेक अनुभव आले. सगळ्यांनी त्यात सहकार्य केले. मात्र खेदाने नमुद करावे लागते, की बॅंक उर्जितावस्थेत होती तेव्हा फक्त कर्जवाटप झाले, कोणीही वसुलीसाठी गेलेच नाही. लोकांनाही कर्ज घेण्याची सवय आहे, परतफेडीची सवयच नाही. वीस-पंचवीस वर्षे लोक कर्जफेड करीत नसतील तर याला काय म्हणावे? असा प्रश्न त्यांनी केला. मी कार्यभार घेतल्यावर वसुलीसाठी अनेक निर्णय घेतले. थकबाकीदारांना विनंती केली. नोटीस बजावल्या. पाठपुरावा केला. त्यानंतरही प्रतिसाद न आल्याने लिलावाची प्रक्रीया सुरु केली. दोन दिवसांपूर्वी बॅंकेने लिलाव ठेवला असता शेतकरी बॅंकेत येऊन अक्षरशः मला शिविगाळ करीत होते. मात्र हे सर्व माझ्यासाठी नव्हे बॅंकेच्या हितासाठी आवश्यक आहे. ही बॅंक शेतक-यांची आहे. त्यांना फक्त सात बारा उतारा पाहून कर्ज दिले जाते. अन्य कोणतिही राष्ट्रीयकृत बॅंक शेतकरी वर्गाला असे कर्ज देतच नाही. हे शेतक-यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. 

भाजपचे फक्त चार संचालक
जिल्हा बॅंकेत भारतीय जनता पक्षाचे फक्त चार संचालक आहेत. त्यांच्या बळावर कोणीही अध्यक्ष होऊ शकत नाही. बॅंकेत शिवसेना, राष्ट्रवादी कॅांग्रेस, कॅांग्रेसचे बहुमत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांवर बॅंकेची स्थिती सुधारण्याची जबाबदारी आहे. कारवाई झालीच तर आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांसह सत्ताधारी पक्षाचे विविध लोकप्रतिनिधी संचालक आहेत. आता त्यांनी पुढे येऊन बॅंकेला उर्जितावस्थेत आणावे असेही श्री. आहेर म्हणाले.
...   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com