आमदारकीसाठी मी कोल्हापुरातून पुण्याला आलो नाही : खडसेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

चंद्रकांतदादा पाटील यांनी आता मार्गदर्शक व्हावे, त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभवावी. त्यांनीही पदे मंत्रीपद तसेच प्रदेशाध्यक्षपद का भूषवावे, असा तिखट सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे
Eknath Khadse Attacks Chandrakant Patil
Eknath Khadse Attacks Chandrakant Patil

जळगाव : भारतीय जनता पक्षा शून्य होता, त्यावेळेपासून मी काम करीत आहे. जळगाव जिल्ह्यात शत:प्रतिशत भाजप मी केले आहे. त्यामुळे पक्ष माझे ऐकत होता, मी सांगितला तो उमेदवार दिला आहे. आम्ही येथेच निवडणुका लढवून यश मिळविले. आमदारकीसाठी मला कोल्हापूरहून पुण्याला जावे लागले नाही असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मुक्ताईनगर येथील त्यांच्या निवासस्थानी 'साम'टीव्हीचे संपादन निलेश खरे यांना मुलाखत देतांना ते म्हणाले, ''जळगाव जिल्ह्यात पक्ष आम्ही उभा केला या ठिकाणी पक्षाचे काही नसतांना तब्बल २७ वर्षे जिल्हा परिषद पक्षाच्या ताब्यात ठेवली. सन १९८९ पासून केवळ दोन अपवाद वगळता जिल्हयातील दोन्ही मतदार संघात भाजपचे खासदार निवडून येत आहेत. ४० वर्षे मी जिल्ह्यात पक्ष वाढविला, त्यामुळे पक्षही माझे एकत होता, मी सांगितला तो उमेदवार पक्षाने दिला आहे. आणि मी तो निवडूनही आणला, मी सुद्धा आमच्या मतदार संघात सतत आठ वेळा निवडून आलो आहे. मी जिल्हा शत:प्रतिशत भाजप केला, परंतु, कोल्हापूर आज भाजप मुक्त आहे. मला निवडून येण्यासाठी 'कोल्हापूर'हून पुण्याला जावे लागले नाही,''

गिरीश महाजनांशी चांगले संबंध

गिरीश महाजन यांच्याबाबतीत बोलतांना ते म्हणाले, ''गिरीश महाजन जामनेर येथे सरपंच असतांनाच्या काळात त्याला विधानसभेची उमेदवारी देण्याबाबत मी प्रयत्न केले होते. त्यांचे व माझे चांगले संबध आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत मी अधिक बोलू इच्छित नाही,''

चंद्रकांतदादाना का हवीत पदे?

खडसेंनी मार्गदर्शक व्हावे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे, त्याला उत्तर देतांना खडसे म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील यांनी आता मार्गदर्शक व्हावे, त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभवावी. त्यांनीही पदे मंत्रीपद तसेच प्रदेशाध्यक्षपद का भूषवावे असा सवालही त्यांनी केला

सहकारात पक्षीय राजकारण कसे?

जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघात घरच्या पदे दिल्याचा चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देतांना ते म्हणाले, "सहकार क्षेत्र पक्षीय राजकारणापासून वेगळे असते. महानंद, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ सहकारी संस्था आहेत. त्यात भाजप कुठे आला. जिल्हा बॅंकेत मुळातच भाजपचे वर्चस्व नव्हते व नाही केवळ चार सदस्य असतांना माझ्यावर विश्‍वास असल्याने मुलीला अध्यक्ष करण्याचा सर्व पक्षीयांनी निर्णय घेतला. जिल्हा दूध संघातही हाच 'फाॅर्म्युला'वापरला गेला. या सहकारी संस्थात भाजपचा चेअरमन गेल्या अनेक वर्षात झालेला नाही. त्यामुळे कुटुंबियांना पदे दिली असे म्हणणाला काही अर्थ नाही. खडसे कुटुंबात एकमेव रक्षा खडसे खासदार आहेत, बाकी कोणाकडे कोणती  राजकीय पदे आहेत हे त्यांनी दाखवून द्यावे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com