अण्णा हजारे म्हणतात महाविकास आघाडी सरकार 'चलती का नाम गाडी' - No plans of Retirement say Anna Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

अण्णा हजारे म्हणतात महाविकास आघाडी सरकार 'चलती का नाम गाडी'

नितीन बारावकर
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

अण्णा हजारे यांनी  एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यातील कोरोना स्थिती, बेरोजगारी, कायदा - सुव्यवस्था, महिला सुरक्षितता हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शासनस्तरावर या विषयांना महत्व दिले जात नसल्याचे दिसते, असे ते म्हणाले

शिरूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सार्वजनिक व सामाजिक निवृत्तीची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. मी केवळ जबाबदारीतून मुक्त होतोय, कार्यातून नाही, असे स्पष्ट करताना माझे वय आत्ता ८३ असून, शंभरीपर्यंत मी जीवनातूनही आणि कार्यातूनही निवृत्त होणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.  राज्यातील महाआघाडी सरकार बद्दल अधिक बोलणे उचित नाही. हे चलती का नाम गाडी सरकार असल्याची टीपण्णी त्यांनी केली. 

भ्रष्टाचार संपविण्यासाठी पुन्हा लढण्याची, पुन्हा जनआंदोलन छेडण्याची पुन्हा तरूणांमध्ये उर्जा निर्माण करण्याची माझी आजही तयारी असून, तरूण पुढे येणार असतील तर त्यांच्यासोबत मी पुन्हा २५ वर्षांचा होऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे, असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यातील कोरोना स्थिती, बेरोजगारी, कायदा - सुव्यवस्था, महिला सुरक्षितता हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शासनस्तरावर या विषयांना महत्व दिले जात नसल्याचे दिसते, असे ते म्हणाले. राज्यातील महाआघाडी सरकार बद्दल अधिक बोलणे उचित नाही. हे चलती का नाम गाडी सरकार असल्याची टीपण्णी त्यांनी केली. 

निवृत्तीचा विषय उडवून लावताना हजारे म्हणाले, ''समाजाने व विशेषतः तरूणांनी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन केले. जे करायचे ते सर्व अण्णा हजारेनीच करायचे, ही भूमिका रास्त नाही. एकटा अण्णा हजारे कुठे कुठे पूरा पडणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने निर्भय होऊन सामाजिक प्रश्नात पुढाकार घ्यायला, वाचा फोडायला शिकले पाहिजे. माझ्याकडे कुठलीही धनदौलत, सत्ता, पैसा नाही पण सामान्य जनतेच्या बळावर दहा कायदे करायला लावले. हे समाजजीवनात लढणा-या प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे,''

''तरूणांनी सत्तेत जाण्याची लालसा धरण्यापेक्षा समाज परिवर्तनात, व्यवस्था परिवर्तनात योगदान द्यावे. तरूण पुढे आले तर त्यांच्यासाठी २५ वर्षांचा होऊन मी त्यांच्यासमोर येईल व मार्गदर्शन करीत राहिल,'' असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

निवृत्ती मी घेऊच शकत नाही. फक्त आता थोडे शांत बसून इतरांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा विचार आहे. थोडे सिंहावलोकन करून आयुष्यात केलेल्या वीस उपोषणांवर त्यातील साधक - बाधकतेवर काही लिहिण्याचे काम चालू आहे. 

विविध सामाजिक प्रश्नांबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार चालू असतो. गैरव्यवहाराची प्रकरणे पुराव्यानिशी संबंधितांना पाठवीत असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्तेत नाहीत, अन्यथा त्यांच्याशीही पत्रव्यवहार केला असता, असेही अण्णा म्हणाले.  

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख