सावरकरांना 'भारतरत्न' का दिले नाही : संजय राऊतांचा भाजपला सवाल - Why BJP not givint Bharatratna to Veer Sawarkar Asks Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

सावरकरांना 'भारतरत्न' का दिले नाही : संजय राऊतांचा भाजपला सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेली अवाक्षर न काढणारे आज उध्दव ठाकरे यांना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काव्यागत न्याय आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. त्यावरुन राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

मुंबई : मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारकात दसरा मेळावा घेतल्याबद्दल टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना सावरकरांना अद्याप 'भारतरत्न' का दिले नाही, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. 

हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा अनेक वर्षे  करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच; पण ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेली अवाक्षर न काढणारे आज उध्दव ठाकरे यांना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काव्यागत न्याय आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. त्यावरुन राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "वीर सावरकरांबद्दल शिवसेना कधीही गप्प बसलेली नाही. शिवसेनेने त्यांच्याबाबतची भूमीका कधीही बदलली नाही हे 'त्यांनी' इतिहास चाळून बघावे. वीर सावरकरांचे हिंदुत्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शक राहिले आहे. सावरकर यांना भारतरत्न द्यावे, ही मागणी शिवसेनेने सर्वात पहिल्यांदा केली होती. आता ज्यांना सावरकरांचा पुळका आला आहे, त्यांनी सावरकरांना 'भारतरत्न' देण्यात काय अडचणी आहेत, हे सांगावे."

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्व पूजाअर्चांपुरते मर्यादित होतेय, असे विधान आज सकाळी केले होते. याचा धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांना काल टोला लगावला होता. सरसंघचालकांप्रमाणे काळी टोपी घालणाऱ्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांनी हे समजून घ्यावे, असे ठाकरे म्हणाले होते. 

राज्यातील मंदिरे उघडावीत, अशी मागणी भाजपकडून वारंवार केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ठाकरे यांनी यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा आधार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे कोश्यारी हे सुद्धा काळी टोपी वापरतात, याचा धागा पकडून ठाकरेंनी कोश्यारींवर निशाणा साधला, होता. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख