..तर चित्रपट सृष्टीनं आवाज उठवावा - संजय राऊत

मराठी माणसानं जन्माला घातलेल्या सिनेसृष्टीवर अश्याप्रकारे दडपण असू नये. लोकशाहीच्या मार्गानं जरी कोणी हुकूमशाहीचा मार्ग स्विकारला असेल तरी देशात लोकशाही नाही, असं मी मानतो असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : जर एखाद्या इंडस्ट्रीवर अश्याप्रकारे हल्ला होत असेल तर तिथल्या सर्वांनी एकत्र आवाज उठवला पाहिजे. कुठल्याही प्रकरणात तपास करण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे. मात्र केवळ शेतक-यांना पाठींबा देतात, जेएनयू बाबत बोलतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय असं बोलतात म्हणून हे होत असेल तर ते चुकीचं आहे,'' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चित्रपट उद्योगांतील काही जणांवर पडलेल्या प्राप्तीकर खात्याच्या छाप्याबद्दल बोलताना व्यक्त केली.

आयकर विभागाकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांची सध्या चौकशी सुरू आहे. त्याबाबत राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, " अश्यानं सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होतात, की काही मोजक्याच जणांविरोधात कारवाई का होते? बोलणा-यांवर गप्प रहा, म्हणून दडपण आणलं जातंय. मराठी माणसानं जन्माला घातलेल्या सिनेसृष्टीवर अश्याप्रकारे दडपण असू नये. लोकशाहीच्या मार्गानं जरी कोणी हुकूमशाहीचा मार्ग स्विकारला असेल तरी देशात लोकशाही नाही, असं मी मानतो.''

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून मोदी सरकारववर टीका करण्यात आलीआहे. सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही. काहीजण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात व पडद्यावर ज्या संघर्षमय भूमिका करतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात जगण्याचा प्रयत्न करतात. ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा चित्रपटांत तापसीने केलेल्या भूमिका ज्यांनी पाहिल्या त्यांना तापसी इतकी बाणेदार का? असे कोडे पडणार नाही. अनुराग कश्यपच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. त्यांचे विचार कदाचित पटत नसतील, पण त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच, असे सामनच्या अग्रलेखात म्हटलं आहे,
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com