तूम मुझे व्होट दो..मै तुम्हे व्हॅक्सिन दूंगा...भाजपच्या घोषणेवर राऊतांची टीका - Sanjay Raut Criticizes BJP over Corona Vaccine Assurance in Bihar Manifesto | Politics Marathi News - Sarkarnama

तूम मुझे व्होट दो..मै तुम्हे व्हॅक्सिन दूंगा...भाजपच्या घोषणेवर राऊतांची टीका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

देशात कोरोनाची साथ असून कोट्यवधी जनता कोरोनाच्या लशीची प्रतिक्षा करत आहे. भाजपने बिहार विधानसभा निवडणुकांसाठी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यावर आता शिवसेनेनेही टीका केली आहे.

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. आता लशीच्या नांवाखाली समाजात फूट पाडण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

देशात कोरोनाची साथ असून कोट्यवधी जनता कोरोनाच्या लशीची प्रतिक्षा करत आहे. भाजपने बिहार विधानसभा निवडणुकांसाठी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यावर आता शिवसेनेनेही टीका केली आहे.

याबाबत बोलताना राऊत म्हणाले, आम्ही लहान असताना एक मंत्र होता तूम मुझे खून दो....मैं तुम्हे आजादी दूंगा...आता भाजपने नवी घोषणा दिली आहे...'तूम मुझे व्होट दो...हम तुम्ही व्हॅक्सिन देंगे'. जे भाजपला मते देतील त्यांना लस मिळेल असा याचा अर्थ आहे का? ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही तिथे लस दिली जाणार नाही का याचे उत्तर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले पाहिजे,"

राऊत पुढे म्हणाले, "अशा पद्धतीने एखादा राजकीय पक्ष भेदाभेद करत असेल तर ती क्रूरता आहे.बिहारमध्ये जर भाजपला मते देणाऱ्यांना लस देणार नाही का?  हे सगळे  काय चालले आहे? मध्य प्रदेशातही हेच म्हटले होते.आधी जाती धर्मावर पाडली जात होती. आता लशीच्या नावावर फूट पाडण्याचा नवा खेळ सुरु झाला आहे. घर, नोकरी यांचे आश्वासन देणे मी समजू शकतो. मात्र या लशीच्या मुद्द्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी होत आहे, असे मला वाटते.''

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे. भाजपने बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात कोरोना लसीचे राजकारण केले आहे. महामारीच्या काळातही राजकिय फायद्याकरिता एका राज्याला विशेष वागणूक देणे पूर्णपणे बेकायदेशीर व अन्यायकारक, अमानुष असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख