तुमच्या डोळ्यांना त्रास होण्यासाठीच माझी नियुक्ती : चंद्रकांत पाटलांना राऊतांचा टोला - Sanjay Raut Comments on Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

तुमच्या डोळ्यांना त्रास होण्यासाठीच माझी नियुक्ती : चंद्रकांत पाटलांना राऊतांचा टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

तुमच्या कानाला आणि डोळ्यांना त्रास व्हावा म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती केली आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उद्देशून लगावला. ईडीसारख्या संस्था चीनच्या सीमेवर पाठवा, असाही चिमटा त्यांनी भाजपला उद्देशून काढला. 

मुंबई : तुमच्या कानाला आणि डोळ्यांना त्रास व्हावा म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती केली आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उद्देशून लगावला. ईडीसारख्या संस्था चीनच्या सीमेवर पाठवा, असाही चिमटा त्यांनी भाजपला उद्देशून काढला. 

आजकाल संजय राऊतांबद्दल बोलणंच मी बंद केलंय. ते इतकं मोठे आहेत की आपण लहान माणसे त्यांच्याबद्दल काय बोलणार, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना उद्देशून काढला होता. त्याला राऊत यांनी प्रतिटोला लगावला आहे. ''पंजाबमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतही राऊत यांनी भाष्य केले. पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगाला आदर्श दाखवून दिला आहे. इतक्या शांततेने त्यांनी हे आंदोलन केले आहे. मात्र, केंद्र सरकारने या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर केला. असाच वापर चीनच्या विरोधात केला असता तर लडाखमध्ये चीनी सैन्य घुसले असते,'' असे राऊत म्हणाले.

सध्या विविध नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. ईडी आणि सीबीआयच्या वापरावरही राऊत यांनी टीका केली. या संस्था दुष्मनांना जेरीस आणतात, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संस्थांनाही चीनच्या सीमेवर पाठवावे, असे राऊत म्हणाले.  

उर्मिला मातोंडकर या उद्या (बुधवारी) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. उर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. ''ऊर्मिला मातोंडकर उदया शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे आमची महिला आघाडी मजबूत होणार आहे,'' असे राऊत यावेळी म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख