महाविकास आघाडीत आलबेल नसून घालमेल... - Pravin Darekar Targets Government over infighting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

महाविकास आघाडीत आलबेल नसून घालमेल...

सुरज सावंत
रविवार, 28 मार्च 2021

संजय राऊत यांच्या लेखणीतून सत्य बाहेर येऊ लागले आहे.  महाविकास आघाडी सरकार हे अपघाती सरकार आहे. सरकारमध्ये सर्व काही अलबेला असल्याचं सांगणारे राऊत आता सर्व काही घालमेल सुरू असल्याचे सांगताना दिसून येत आहेत, अशी टिका प्रवीण दरेकर यांनी येथे केली

मुंबई : संजय राऊत यांच्या लेखणीतून सत्य बाहेर येऊ लागले आहे.  महाविकास आघाडी सरकार हे अपघाती सरकार आहे. सरकारमध्ये सर्व काही अलबेला असल्याचं सांगणारे राऊत आता सर्व काही घालमेल सुरू असल्याचे सांगताना दिसून येत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राऊतांना म्हणतात मिठाचा खडा टाकू नये, यावरुन हे सरकार निसरड्या वाटेवरुन चालताना दिसते आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. Pravin Darekar Targets Government over infighting 

 ''अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. सचिन वाझेला (Sachin Waze) मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातबसून वाझे (Sachin Waze) वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?" असा सणसणीत आहेर शिवसेना खासदार व शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पर्यायाने आपल्या महाविकास आघाडीला दिला. त्यावरून आज दरेकर यांनी सरकारला टीकेचे लक्ष्य बनविले.

दरेकर म्हणाले, ''सरकारमध्ये अस्वस्था आहे, तिन्ही पक्ष तीन दिशांना आहेत. महाराष्ट्राला अवकाळीने ग्रासले आहे. नाशिकचा शेतकरी आता आत्महत्येसारख टोकाचे पाऊल उचलू शकतो. याबाबत मुख्यमंञ्यांशी चर्चा झाली. निफाड, दिंडोरी या भागातील शेतकरी कर्ज बाजारी आहेत. अनेक शेतकरी पै पाहुण्यांकडून कर्ज काढून बसले आहेत. या अवकाळी पावसामुळे सुशिक्षित शेतकरीही टोकाचे पाऊल उचलण्याचा विचारातआहेत.असे असताना, कृषीमंत्री, पालकमंत्री हे फिरकले देखील नाहीत याहून दुर्दैव काय ? शेतकऱ्यांनी जमिनी विकायला काढल्या आहेत .शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावे, तात्काळ हेक्टरी मदत करा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, ''Pravin Darekar Targets Government over infighting 

कोरोनाबाबत बोलताना दरेकर म्हणाले, ''विविध जिल्हे कोरोनाने ग्रस्त आहेत. त्यांच्यापर्यंत ओषध पोहचत नाही.  सरकार कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी निर्बंध हाच उपाय योजत आहे. मात्र, याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. अनेकांच्या नोकाऱ्या गेल्या आहेत, मुलांचे शिक्षणासारख्या अशा अनेक गोष्टी लोकांसमोरआहेत. त्यामुळे कोरोनाने किंवा उपासमारीने नागरिक मरतील. कायदे कडक नक्की करा.  मात्र, जनतेला विश्वासात घ्या. आपण उपाय योजना करण्यात कमी पडतोय त्याकडे लक्ष द्यायला हवे. दुकाने बंद करून किंवा इतर गोष्टी बंद करून प्रश्न सुटणार नसून अधिक चिघळणार आहे."
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख