पवारांना माझ्यामुळेच रायगड दौरा करावा लागला : प्रवीण दरेकर

निसर्ग चक्रीवादळानंतर सर्वप्रथम रायगड जिल्ह्याचा पहिला दौरा मी केला आणि शासनाचे लक्ष वेधून घेतले. माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांनाही जिल्ह्याचादौरा करावा लागला, असा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला
Pravin Darekar Criticizes Government for Financial Help to Konkan
Pravin Darekar Criticizes Government for Financial Help to Konkan

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळानंतर सर्वप्रथम रायगड जिल्ह्याचा पहिला दौरा मी केला आणि शासनाचे लक्ष वेधून घेतले. माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला, असा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

वादळामध्ये म्हसळा,श्रीवर्धन,हरेश्वर,बोर्ली पंचतन,दिवेआगर सह संपूर्ण कोकणाचे अतोनात नुकसान झाले असून 25 कोटी आणि 100 कोटी अश्या तुटपुंज्या मदतीवर जिल्ह्यातील लोकांचे भागणार नाही. कोकणाच्या जनतेची थट्टा करून जनतेची फसवणूक करून कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे धंदे सोडून द्यावेत,'' असे दरेकर यावेळी म्हणाले.

सरकारला उद्देशून ते म्हणाले, "कोकणाच्या जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे, अगदी ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषदेपासून राज्याचीही सत्ता तुम्हाला दिली असून शासनाने हात आखडता न घेता कोकणाला भरभरून मदत द्यावी," 

एसडीआरएफ मधून कोणीही मदत करतो पण ती मदत कुणाकुणाला पुरणार, असा प्रश्नही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.कोकणातील गावेच्या गावे,बागाच्या बागा उध्वस्त झाल्या असून लोकांचे संसार उभारण्यासाठी जास्तीत जास्त मदत व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी जिल्ह्याचे भाजपा चे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक,मदन वाजे तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,माजी,मंगेश मुंडे, अध्यक्ष शैलेश पटेल आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com