जयंत पाटील यांनी केली खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा

शुक्रवारी एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश आहे. त्यांच्या सोबत कोण येणार यावर अजून आमची चर्चा झाली नाही. भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला. भाजप विकास करू शकणार नाही असं ज्या नेत्यांना वाटतंय ते सर्वजण आमच्याकडे येतील," अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
Ekanath Khadse - Jayant Patil
Ekanath Khadse - Jayant Patil

मुंबई : शुक्रवारी एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश आहे. त्यांच्या सोबत कोण येणार यावर अजून आमची चर्चा झाली नाही.  भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला. भाजप विकास करू शकणार नाही असं ज्या नेत्यांना वाटतंय ते सर्वजण आमच्याकडे येतील," अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

काही वेळापूर्वीच 'सरकारनामा'ने खडसेंचा शुक्रवारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे वृत्त दिले होते. खडसे यांनी त्यांचा‌ पक्ष सोडलेला आहे 
त्यांनी भाजपचा त्याग केलेला आहे . शुक्रवारी दोन वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे काही वेळातच जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. गेली तीन दशकांहून अधिक काळ भाजपमध्ये असलेले खडसे आता भाजपमध्ये नाहीत. काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्याला हे सांगितले आहे. असे पाटील म्हणाले. 

''काही आमदार खडसे यांच्या संपर्कात आहे. मात्र, आता कोरोनाच्या काळात विधानसभा निवडणूक घेण्याची गरज नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जे येतील त्यांचे आम्ही स्वागत करु, असेही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. ही आता सुरुवात झाली आहे. काही चांगले लोक पक्षात येण्याबाबत चर्चा करताहेत असेही ते म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती. खडसे राजीमाना देणार असल्याचे 'सरकारनामा'ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. आता खडसे यांनी अंतीम निर्णय घेतला आहे. काही वेळात खडसे भाजपचा राजीनामा देणार असून उद्या ते काही निवडक निकटवर्तींयांसह मुंबईला जाणार आहेत. काही वेळात स्वतः जयंत पाटील याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

दुसरीकडे भाजपचे खडसे यांना थांबवण्याचे प्रयत्न फोल ठरल्याचे यावरुन दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाकडूनही खडसेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरू होते.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जावू नये यासाठी चर्चा केली होती. याला खडसे यांनीही  दुजोरा दिला होता. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com